Ram Mandir : प्राण प्रतिष्ठापणेनंतर श्री रामाला दाखवणार 151 बनारसी पानांचा नैवेद्य, काय आहे याचे महत्त्व?
हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो.
अयोध्या : 2024 चा पहिला महिना ऐतिहासिक असणार आहे. 22 जानेवारीला राम नगरी अयोध्येत राम मंदिराचा (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा होणार आहे. यासाठी शासन आणि प्रशासन दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. प्राणप्रतिष्ठा अनेक मोठ्या विधींनी केली जाईल. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद असा असेल आणि हा कालावधी एकूण 84 सेकंदांचा आहे. प्रभू रामाला 56 प्रकारचे नैवेद्य दाखवल्या जाणार आहे. यापैकी एक म्हणजे मसाला बनारसी पान. होय, फक्त एक पान नाही तर 151 पानांना नैवेद्य दाखवला जाणार आहे. यामागील धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.
पानाचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात पुजेसाठी अनेक साहित्य वापरले जातात. विड्याच्या पानांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला आणि म्हणूनच प्रत्येक विशेष पूजेमध्ये विड्याची पाने आणि सुपारीचा वापर केला जातो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासह अनेक देवता विड्याच्या पानात वास करतात असे मानले जाते. त्यामुळे राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी विड्याची पानंही अर्पण करण्यात येणार आहे.
बनारसचे खास पान
रामललाच्या अभिषेक प्रसंगी, बनारसमधून 151 विशेष विड्याच्या पानांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. 151 पानांव्यतिरिक्त 1000 पानांची ऑर्डर देण्यात आली आहे जी भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जाईल. प्रसादासाठी हे पान बनारसच्या रिंकू चौरसिया बनवणार आहेत. असे म्हटले जाते की त्यांच्या दोन पिढ्या बऱ्याच काळापासून श्रीरामांना विड्याची पानं पाठवत होत्या.