राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेवेळी गर्भगृहात फक्त पाचच VIP, मोदी, भागवत आणि…

प्राण प्रतिष्ठा सोहळा हा सात दिवस सुरू राहणार आहे. 16 जानेवारीपासून हा सोहळा सुरू होईल. 16 जानेवारी रोजी विष्णू पूजा आणि गौदान होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची शहरभर मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं भव्य आयोजन केलं जाईल.

राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेवेळी गर्भगृहात फक्त पाचच VIP, मोदी, भागवत आणि...
Ram MandirImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:37 PM

अयोध्या | 29 डिसेंबर 2023 : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देशभरातून लोक येणार असल्याने संपूर्ण परिसर सजवला जात आहे. येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. मात्र, मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाचच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि मंदिराचे मुख्य पुजारी या मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्यात आलं आहे. मूर्तीची निवड करण्यापासून ते ट्रस्टच्या बैठकीच्या आयोजनापर्यंतची प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध केली गेली. या महत्त्वाच्या बैठकीला नृपेंद्र मिश्रा, चंपत राय, वासुदेवानंद सरस्वती, स्वामी परमानंद, राजा अयोध्या विमलेंद्र मोहन मिश्रा आणि महंत जिनेंद्र दास आदी उपस्थित होते.

योगींकडून पाहणी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव (गृह) संजय प्रसादही उपस्थित होते. त्यांनी राम मंदिर निर्माण कार्याची पाहणी केली. तसेच राम जन्मभूमी भक्तीपथाचीही पाहणी केली. अयोध्या एअरपोर्ट आणि रेल्वे स्थानकाचीही ते पाहणी करणार आहेत.

सात दिवस सोहळा

प्राण प्रतिष्ठा सोहळा हा सात दिवस सुरू राहणार आहे. 16 जानेवारीपासून हा सोहळा सुरू होईल. 16 जानेवारी रोजी विष्णू पूजा आणि गौदान होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची शहरभर मिरवणूक काढण्यात येणार आहे. 18 जानेवारीला गणेश पूजन होईल. सोबतच वरुण देव पूजा आणि वास्तू पूजाही होईल. 19 जानेवारी रोजी हवन आणि अग्नि प्रज्वलीत केली जाईल. तसेच पुन्हा हवन केलं जाईल. 20 जानेवारी रोजी वास्तू पूजा होईल. 21 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तींना नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान घातलं जाईल. तर 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं भव्य आयोजन केलं जाईल.

फक्त 84 सेकंदाचा मुहूर्त

22 जानेवारी रोजी अयोध्येत नव्यान निर्माण केलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी फक्त 84 सेकंदाचा अति सुक्ष्म मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावरच रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाईल. काशीचे ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढला आहे. या शुभ मुहूर्ताचा क्षण फक्त 84 सेकंदाचा आहे. हा मुहूर्त 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदाचा असेल.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....