Ram Mandir : प्राणप्रिष्ठेनंतर रामललाचे पुरविले जात आहेत लाड, नैवेद्यांमध्ये असतो या पदार्थांचा समावेश
अयोध्येच्या राम मंदिरात विराजमान झालेल्या श्री रामाचे बालरूप असलेल्या रामललाचे सर्व लाड पूरविले जात आहेत. रोज पहाटे साडेचार वाजता काकड आरतीतून रामललाला सकाळी उठविले जाते. यानंतर रामललाला रबरी, पेढा इत्यादींचा बाल भोग दाखविला जातो. सकाळी साडेसहा वाजता शृंगार आरती होते. सात वाजता दर्शनाचा क्रम सुरू होतो.
अयोध्या : मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतर रामलल्या (Ramlala) सेवेत कुठलीच कसर सोडली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. रामललाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी गर्भगृहात ब्लोअर बसवण्यात आले आहे. यावेळी लाखो भाविक प्रभू श्री रामाच्या बालस्वरूपाचे दर्शन घेत आहेत. पूजारी दिवसातून अनेकदा बालस्वरूपात असलेल्या प्रभू रामाला नैवेद्य अर्पण करतात. केशर मिश्रित दूध आणि खीर हे इथले खास पदार्थ आहेत, जे दररोज नियोजित वेळी दिले जातात. विशेष बालभोग नियमितपणे सकाळी 9 आणि 2 वाजता दिले जातात.
पहाटे साडेचार वाजता होते मंगला आरती
रोज पहाटे साडेचार वाजता काकड आरतीतून रामललाला सकाळी उठविले जाते. यानंतर रामललाला रबरी, पेढा इत्यादींचा बाल भोग दाखविला जातो. सकाळी साडेसहा वाजता शृंगार आरती होते. सात वाजता दर्शनाचा क्रम सुरू होतो.
थंडी पाहता दररोज सकाळी नऊ वाजता केशरमिश्रित दूध पिण्याची विनंती रामललाला केली जाते. दुपारी 12 वाजता नैवेद्य आरती होते. राज भोगामध्ये वरण, भात, पोळी, भाजी आणि खीर दिली जाते. त्यानंतर चारच्या सुमारास रामललाला केशर मिश्रीत खीर अर्पण केली जाते.
काही वेळा देवाला नमकीन अन्नही अर्पण केले जाते. संध्याकाळची आरती संध्याकाळी साडेसात वाजताच होते. पुन्हा दर्शन सुरू होते. रात्री नऊ वाजता वरण, भात, पुरी, भाजी, खीर यांचा नैवेद्य दाखवला जातो. रात्री 10 वाजता शयन आरती करून आराध्याला झोपवले जाते.
तीर्थक्षेत्र ट्रस्टने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले
मंगला आरती – पहाटे 4.30 वाजता शृंगार आरती,
(उत्थान आरती) – सकाळी 6.30 वाजता भाविकांना दर्शन
सकाळी 7 वाजता नैवेद्य आरती : सायंकाळची आरती दुपारी 12 वाजता
रात्री 7.30 वाजता नैवेद्य आरती, रात्री 10 वाजता शयन आरती
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)