Ram Mandir : आज अनुष्ठाणाच्या चौथ्या दिवशी राम मंदिर परिसरात यज्ञ कुंडांची स्थापना, असे होणार पूढचे विधी
19 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. अग्नी विशिष्ठ पद्धतीने प्रज्वलित केली जाईल. राम मंदिरातील यज्ञ अग्नी कुंडाची स्थापना विशेष विधीद्वारे करण्यात आली आहे. यासाठी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड तयार करण्यात आला.

अयोध्या : अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारीला हा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात होणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi at Ayodhya) यांचा 11 दिवसांचा विशेष विधीही होणार आहे. प्राणप्रतिष्ठा विधीचा आज चौथा दिवस आहे.आज विशेष अग्नी यज्ञाची स्थापना करण्यात येत आहे. आज दिवसभर पूजा सुरू राहणार असून, पूजेसाठी देशभरातून खास साहित्य आले आहेत, ज्याचा पूजेत वापर केला जात आहे.
विशेष पद्धतीने केली जाईल अग्नी यज्ञाची स्थापना
19 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. अग्नी विशिष्ठ पद्धतीने प्रज्वलित केली जाईल. राम मंदिरातील यज्ञ अग्नी कुंडाची स्थापना विशेष विधीद्वारे करण्यात आली आहे. यासाठी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड तयार करण्यात आला असून त्यात पुजारी वैदिक मंत्रांचा उच्चार करून आणि इतर विशेष पद्धती वापरून अग्नि प्रज्वलित करतील.
या यज्ञमंडपात अरणी मंथनाद्वारे अग्निदेव प्रकट होतील. तसेच आज वास्तुशांतीची विशेष पूजा केली जाईल. या यज्ञमंडपात 18 कलश बसवण्यात येणार आहेत. असे म्हणतात की परमेश्वराचे मुख अग्नीच्या रूपात आहे. जगाचा पालनकर्ता भगवान विष्णू आणि संपूर्ण जगाला चैतन्य देणार्या 33 कोटी देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञाच्या वेळी अग्निकुंडात त्याची प्रतिष्ठापना केली जाते.




यज्ञ अग्नी कुंडाची स्थापना का केली जाते?
धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की यज्ञ अग्निकुंड स्थापित केल्याने वातावरणात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि आसपासच्या भागातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची आहूती दिल्या जातात, ज्या अग्नीत जाळल्यास वातावरणातील विषाणू नष्ट होतात. अग्निकुंडाच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक शक्तीही दूर होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)