Ram Navmi 2023 : वैवाहिक जीवनात असेल कटूता तर राम नवमीच्या दिवशी अवश्य करा हे उपाय

भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत झाला. रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

Ram Navmi 2023 : वैवाहिक जीवनात असेल कटूता तर राम नवमीच्या दिवशी अवश्य करा हे उपाय
राम नवमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 8:12 PM

मुंबई : दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला राम नवमी साजरी करण्यात येते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी (Ram Navami 2023) म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत झाला. रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा राम नवमी 30 मार्च 2023 ला साजरी होणार आहे.

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी राम नवमीला अवश्य करा हे उपाय

रामनवमीला रात्री खीर बनवा आणि सुमारे एक तास चंद्राच्या प्रकाशात ठेवा. यानंतर, पती -पत्नी दोघांनीही खीर एकत्र सेवन करा. हा उपाय केल्याने, वैवाहिक जीवनातील अडचणीवर मात केली जाते. इतकेच नाही तर एकमेकांबद्दल प्रेम वाढते.

श्रीरामचंद्र कृपालु भजु मन अर्थात श्री राम स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करा. असे केल्याने माणसाचे दु:ख दूर होतात.

हे सुद्धा वाचा

रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते.

रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ‘ओम श्री हरीं रामचंद्राय श्री नमः’ या रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा. हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. हा उपाय केल्याने वास्तू दोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.