Rang Panchami 2021 | होळी झाली, आता करा रंगपंचमीची तयारी…
होळी 2021 सण झाला आहे आता देवी-देवतांची होळी म्हणजेच (Rang Panchami 2021) रंगपंचमीचा सण येणार आहे.
मुंबई : होळी 2021 सण झाला आहे आता देवी-देवतांची होळी म्हणजेच (Rang Panchami 2021) रंगपंचमीचा सण येणार आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षच्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे याला कृष्ण पंचमी देखील म्हणतात. या दिवशी लाक राधा-कृष्ण आणि इतर देवी देवतांनाही गुलाल आणि रंग लावतात. रंगपंचमी विशेषकरुन मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये खेळली जाते. यावर्षी रंगपंचमी 2021 (Rang Panchami 2021 Date Shubh Muhurt And Know Where The Rang Panchami Celebrates) 2 एप्रिलला येत आहे.
रंगपंचमीचा दिवस देवी-देवतांना समर्पित असतो. मान्यता आहे की या दिवशी देवी-देवता ओल्या रंगांनी होळी खेळतात. रंगपंचमीच्या दिवशी लोक रंग आणि गुलाल उडवतात. अशी देखील मान्यता आहे की, आकाशात उडत्या गुलालाचा ज्याला कोणाला स्पर्श होतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि नकारात्मकता समाप्त होते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी राधारानी आणि भगवान कृष्णाला गुलाल अर्पित केला जातो, तर काही ठिकाणी देवी लक्ष्मीचीही पूजा केला जाते.
जन्मकुंडलीचे दोष दूरल होतील
मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी जर विधिवत देवाची पूजा केली तर त्याच्या कुंडलीतील सर्व मोठे दोष नष्ट होऊ शकतात. रंगपंचमी धनदायकही मानलं जातं, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. अनेक ठिकाणी या सणाला श्री पंचमीच्या नावानेही ओळखलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करते वेळी त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार, दोन वात असलेला दिवा आणि पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवावं. यानंतर त्यांच्याकडे घरावर कृपा ठेवण्यासाठी प्रार्थना करा.
महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम
महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
इंदूरची रंगपंचमी सर्वात हटके
रंग पंचमी देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण, मध्यप्रदेशातील इंदूरसारखी रंगपंचमी तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. या दिवशी शहरातील राजबाडा येथे लाखो लोक एकत्र येत मिरवणूक काढतात. याला गेर म्हणतात. या दरम्यान रामरज नावाचा गुलाल आकाशात उडवला जातो. शहरात सार्वजनिक अवकाश होता है.
देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते
मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. पंचमीच्या दिवशी लक्ष्मीजीच्या पूजेमुळे काही ठिकाणी याला श्रीपंचमीच्या नावाने देखील ओळखलं जातं.
लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त
सकाळी : 04:46 – 05:33
दुपारी : 12:05 – 12:54
सायंकाळी : 07:31 – 09:00
Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते…https://t.co/kgDfAIZfpP#RangPanchami #Holi2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
Rang Panchami 2021 Date Shubh Muhurt And Know Where The Rang Panchami Celebrates
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Holi 2021 | होळी… राधा-कृष्णाच्या प्रेमाचा प्रतीक आहे हा सण…
Holi 2021 | होळीच्या सणाला भांग का पितात? यामागील आख्यायिका काय?
Holi Bhai Dooj 2021 | आज आहे होळी भाऊबीज, जाणून घ्या या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण का करावं?