रंगभरी एकादशी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
होळीच्या (Holi) काही दिवस आधी, फाल्गुन महिन्यातील शुक्ल (Shukla) पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी म्हणतात . सामान्यतः सर्व एकादशीला नारायणाची पूजा केली जाते, परंतु ही एकमेव एकादशी आहे ज्यामध्ये नारायणासोबत महादेव आणि माता पार्वतीचीही पूजा केली जाते.
मुंबई : होळीच्या (Holi) काही दिवस आधी, फाल्गुन महिन्यातील शुक्ल (Shukla) पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी म्हणतात . सामान्यतः सर्व एकादशीला नारायणाची पूजा केली जाते, परंतु ही एकमेव एकादशी आहे ज्यामध्ये नारायणासोबत महादेव आणि माता पार्वतीचीही पूजा केली जाते. त्यावर रंग (Colours) आणि गुलाल ओतून होळी खेळली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते, म्हणून या एकादशीला अमलकी एकादशी किंवा आवळा एकादशी असेही म्हणतात . यावेळी रंगभरी एकादशी 14 मार्चला येत आहे. महादेव आणि माता पार्वती यांचा रंगभरी एकादशीशी कसा संबंध होता आणि त्यांच्यासोबत होळी खेळण्याची परंपरा का सुरू झाली . महाशिवरात्रीला पार्वतीशी विवाह केल्यानंतर महादेवाने रंगभरी एकादशीच्या दिवशी पार्वतीवर निर्सगाने रंगांची उधळण केली होती. असे मानले जाते की या दिवशी ते पहिल्यांदा काशी विश्वनाथ मार्गे कैलास पर्वतावर पोहोचले. त्यावेळी वसंत ऋतूमुळे सर्वत्र निसर्ग बहरला होता. महादेवाच्या भक्तांनी त्या दोघांवर रंगांचा उधळण केली. यासोबतच त्यांच्यावर रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आणि या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची आणि त्यांच्यासोबत होळी खेळण्याची प्रथा सुरू झाली.
आवळाच्या (Gooseberry) झाडाचीही पूजा
फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला अमलकी एकादशी (Amalaki Ekadashi) म्हणतात. या एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी नारायणाच्या पूजेबरोबरच आवळाच्या (Gooseberry) झाडाचीही पूजा केली जाते. यासोबतच नारायणाला आवळ्याचे फळ अर्पण केले जाते.
अमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त अमलकी एकादशी तिथी 13 मार्च रोजी सकाळी 10.21 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, 14 मार्च रोजी दुपारी 12.05 पर्यंत असेल. तिथीनुसार हे व्रत 14 मार्च रोजी ठेवण्यात येणार आहे. 15 मार्च रोजी सकाळी 06.31 ते 08.55 पर्यंत व्रत सोडण्याचा शुभ मुहूर्त असेल.
अमलकी एकादशीची पूजा पद्धत अमलकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करून भगवान विष्णूसमोर व्रत करावे. यानंतर आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूचा फोटो ठेवून त्यांची विधिवत पूजा करावी. चंदन, अक्षत, फुले, धूप आणि नैवेद्य अर्पण करा. तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूला आवळा अर्पण करा. यानंतर अमलकी एकादशी व्रताची कथा वाचा किंवा ऐका आणि आरती करा. निर्जल, उपवास किंवा फळाहार घेऊन दिवसभर उपवास करावा. द्वादशीला स्नान करून पूजा केल्यानंतर ब्राह्मणाला अन्नदान करा आणि त्यानंतर उपवास सोडावा.
पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभीतून झाला होता. एकदा ब्रह्माजींनी स्वतःला जाणून घेण्यासाठी परब्रह्माची तपश्चर्या सुरू केली. त्यांच्या भक्तिमय तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले. नारायणाला पाहताच ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याचे अश्रू नारायणाच्या चरणी पडत होते. असे म्हणतात की विष्णूच्या पाया पडल्यानंतर त्या अश्रूंचे रूपांतर आवळ्याच्या झाडात झाले होते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
12 march 2022 Panchang | 12 मार्च 2022, शनिवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Chanakya Niti| गगनात उंच भरारी घ्यायची आहे ? , यश हवंय मग या 5 गोष्टींपासून चार हात लांबच राहा