Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…
घरांमध्ये कुत्रे, मांजर, पोपट इत्यादी पाळले जातात, तर उंदीर, चिचुंद्री, मुंग्या इत्यादी घरावर अधिराज्य गाजवतात. कधी कधी पक्षी किंवा कबूतरही घरटे बनवतात. यातील काही जीवांचे घरात राहणे शुभ असते तर काहींचे अशुभ. वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रामध्ये या प्राण्यांपासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत देखील सांगितले आहेत.
मुंबई : घरांमध्ये कुत्रे, मांजर, पोपट इत्यादी पाळले जातात, तर उंदीर, चिचुंद्री, मुंग्या इत्यादी घरावर अधिराज्य गाजवतात. कधी कधी पक्षी किंवा कबूतरही घरटे बनवतात. यातील काही जीवांचे घरात राहणे शुभ असते तर काहींचे अशुभ. वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रामध्ये या प्राण्यांपासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत देखील सांगितले आहेत. यामध्ये घरात अनेकदा दिसणारे उंदीर आणि चिचुंद्री यांच्याबद्दलही शकुन आणि अपशकुन सांगितले आहेत.
खूपसारे उंदीर पाहणे अशुभ असते
काळे उंदीर हे बहुतेक घरांमध्ये दिसतात. काळे उंदीर मर्यादित प्रमाणात दिसणे हे सामान्य आहे, परंतु अचानक घरात काळ्या उंदरांची संख्या वाढली तर ती धोक्याची बाब आहे. उंदरांची संख्या अचानक वाढल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करा आणि नुकसानीबाबत सतर्क राहा. जास्त उंदीर देखील घरात नकारात्मकता आणतात.
चिचुंद्री दिसणे म्हणजे लक्ष्मीचा वास
घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं मानतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात. साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल. पण, चिचुंद्री थुंकी विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते.
चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत
चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच. याशिवाय, चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे.
दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते. त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते.
चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते. अनेक संकटे संपतात.
नोकरी मिळत नाहीये? कामं लांबणीवर जात आहेत ? मग गुळाचा वापर करा नशीब नक्की चमकेलhttps://t.co/TrMQ5wJKfi#Ayurveda | #jaggery|
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या :
Mahadev | भोळ्याशंकराला प्रसन्न करायचंय, सोमवारी दुधाचे हे 4 उपाय करा
Lord Sun Remedies | सूर्य देवाची कृपा हवी असेल तर, अर्घ्य वाहताना या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा