घरातील बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवा हे नियम, घरात नांदेल सुख समृद्धी

लड्डू गोपाळ म्हणजेच बाळकृष्ण त्यांची सेवा करताना अनेक नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बाळकृष्णाची खऱ्या मनाने सेवा केल्याने पूजा करणाऱ्याच्या घरात आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे वातावरण कायम राहते अशी मान्यता आहे. बाळकृष्णांना चहा, बिस्किटे असे देताना तुम्ही अनेक जणांना पाहिले असेल पण हे करणे खरंच योग्य आहे का ते जाणून घेऊ.

घरातील बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवा हे नियम, घरात नांदेल सुख समृद्धी
बाळकृष्ण
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 7:40 AM

श्रीकृष्णाची बालस्वरूपात बाळकृष्ण किंवा लड्डू गोपाळ म्हणून पूजा केली जाते. असे मानले जाते की ज्या घरात लड्डू गोपाल म्हणजेच बाळकृष्ण असतो आणि दररोज त्यांची नियमित पूजा केली जते त्या घरात सुख-समृद्धी नेहमीच राहते. अनेक वेळा असे होते की घरी जे बनवले जाते बाळकृष्णाला तेच नैवेद्य म्हणून दाखवल्या जाते. पण हे करणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. बाळ गोपाळांना कोणत्या वस्तू नैवेद्यात अर्पण केल्या जाऊ शकतात हे जाणून घेऊ.

या पदार्थांचा दाखवला जातो नैवेद्य

बऱ्याच घरांमध्ये असे होते की जे काही खाद्यपदार्थ घरांमध्ये तयार केले जातात ते आधी बाळकृष्णांना दिले जातात. बाळकृष्णांना काही जण केक, चहा, बिस्किटे आणि स्नॅक्स यासारख्या वस्तू देखील नैवेद्य म्हणून दाखवतात. पण हे करण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवले पाहिजे अन्यथा नैवेद्य अर्पण केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही.

काय आहेत नियम?

तुम्ही जे काही खाता किंवा घरी बनवता ते प्रथम बाळकृष्णांना अर्पण करावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण विशेषतः लक्षात ठेवा की तुम्ही जे बाळकृष्णाला अर्पण कराल ते पूर्णपणे शुद्ध असणे आवश्यक आहे. तसेच आंघोळ केल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करा आणि नैवेद्य तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. जर तुम्ही बाहेरून आणलेला पदार्थ बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवणार असाल तर ते करण्यापूर्वी तुम्ही पॅकेटवर लिहिलेली सामग्री अवश्य एकदा वाचा.

या मंत्राचा जप करा

‘ त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये। गृहाणे सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।

बाळकृष्णला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही या मंत्राचा जप करा असे केल्याने बाळकृष्ण तुमचा नैवेद्य लवकर स्वीकार करेल. या मंत्राचा अर्थ असा आहे की देवा माझ्याकडे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे आणि ते मी तुला अर्पण करत आहे ते स्वीकार कर आणि माझ्यावर आशीर्वाद कायम ठेव.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.