संत प्रेमानंद महाराजांचा तो थरारक अनुभव, भल्या पहाटे झाले असे काही…विशालकाय प्राणी.. मग बसली अनेकांची दातखिळी
Saint Premanand Maharaj : संत प्रेमानंद महाराज प्रत्येक दिवशी भल्या पहाटे 2 वाजता पदयात्रा करून त्यांच्या आश्रमात येतात. याच क्रमात एके दिवशी ते बाहेर पडले त्यावेळी त्यांच्या रस्त्यात अचानक एक मोठे जनावर आले. मग झाले असे की...

संत प्रेमानंद महाराज देशातच नाही तर परदेशात पण लोकप्रिय आहेत. त्यांच्या पदयात्रेत देश-विदेशातील अनेक भाविक भक्त सहभागी होतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर आला आहे. या व्हायरल व्हिडिओत संत प्रेमानंद महाराज त्यांच्या सेवकांसह, भक्तांसह भल्या पहाटे 2 वाजता पदयात्रा करताना दिसून येत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्त पण दिसत आहेत. महाराजांना पाहून त्यांचा आनंद ओसांडून वाहत आहे. पण किस्सा असा आहे की, अनेकांची दातखिळी बसेल…
काय आहे ती घटना?
प्रेमानंद महाराज भल्या पहाटे 2 वाजता पदयात्रेसाठी जात होते. त्यावेळी समोरून एक बैल सुसाट धावत आला. त्यावेळी त्यांच्या सोबतच्या भक्तांनी, सेवेकऱ्यांनी त्यांना बाजूला केले. त्यामुळे ते वाचले. तो इतक्या जोराने धावून आला की अनेकांची पाचर धारेवर बसली. तो बैल तसाच सुसाट पुढे गेला. महाराजांच्या पदयात्रेला विरोध होण्यापूर्वीची ही घटना होती. पण हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.




प्रेमानंद महाराज यांची पदयात्रा मध्यंतरी वादात सापडली होती. महाराज भल्यापहाटे 2 वाजता पदयात्रा सुरू करायचे. या पदयात्रेत एक कॉलनी पडते. त्यात NRI Green Society येते. या सोसायटीतील काही महिलांनी या पदयात्रेला विरोध केला. त्यानंतर ही पदयात्रा बंद करावी लागली. त्यामुळे भाविक भक्तांना त्यांचे दर्शन घेताना अडचण येत होती. त्यानंतर एनआरआय सोसायटीच्या अध्यक्षांनी घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागीतली. त्यांनी पदयात्रा काढण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर पुन्हा ही पदयात्रा सुरू झाली. पुन्हा एकदा भक्तांना त्यांचे दर्शन घेता येऊ लागले.
तर काही वर्षापूर्वी दिसली होती हडळ
तर प्रेमानंद महाराज नावारूपाला, सोशल मीडियावर व्हायरल होण्याअगोदर त्यांना एक हडळ दिसली होती. ही हडळ नववधूच्या रूपात आली होती. ती सारखी त्यांच्या रस्त्यात आडवी येत होती. हा पाठलाग सुरूच होता. या गडबडीत गाव तर मागे सुटले. मध्यरात्री, ब्रह्म मुहुर्ताच्या अगोदर ही नववधू महाराजांना चकवा देत होती.
मग महाराजांना अंदाज आला की हे काही साधारण व्यक्ती नाही. त्यांनी लागलीच तिला विचारले, तू आहेस तरी कोण? तिने डोक्यावरील पदर मागे घेतला. महाराजांनी क्षणाचाही विचार न करता कमंडलमधील पाणी खाली टाकले. त्यांनी नाम जप सुरू केला. देवाचा धावा केला. ते पुढे निघून गेले. परत त्या ठिकाणी आले तेव्हा तिथे कोणीच दिसले नाही.