Pandharpur wari 2022: 20 जूनला होणार तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; असा असेल पुढचा कार्यक्रम

कोरोना निर्बंधामुळे गेले दोन वर्ष पंढरपूर वारीला ब्रेक लागला होता. विठुरायाच्या कृपेने यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातवरण आहे. वारकरी सांप्रदायात तुकोणाच्या वारीला विशेष महत्त्व असते. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यंदा 10 […]

Pandharpur wari 2022: 20 जूनला होणार तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; असा असेल पुढचा कार्यक्रम
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:58 PM

कोरोना निर्बंधामुळे गेले दोन वर्ष पंढरपूर वारीला ब्रेक लागला होता. विठुरायाच्या कृपेने यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातवरण आहे. वारकरी सांप्रदायात तुकोणाच्या वारीला विशेष महत्त्व असते. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यंदा 10 जुलै दिवशी पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू (Dehu) मधून संत तुकाराम महाराजांची (Sant Tukaram maharaj Palkhi 2022) आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dyaneshwar maharaj Palkhi 2022) ही आळंदी (Aalandi) येथून प्रस्थान करणार आहे. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तुकारामांच्या पालखीमध्ये ‘रिंगण’ हे विशेष आकर्षण असते. यामध्ये ‘गोल रिंगण’ आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारचे रिंगण पाहता येतात. गोल रिंगणामध्ये पालखी भोवती  भक्त  मानवी साखळी करतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकाच घोडयावर घोडेस्वार असतो.तर  दुसर्‍या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्‍यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्‍यांची गर्दी असते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. यंदा ताब्बाडाला दोन वर्षानंतर हे सर्व अनुभवता येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

रिंगण सोहळ्याच्या तारखा

  1. पालखी प्रस्थान – 20 जून 2022
  2. पहिलं गोल रिंगण – 30 जून 2022 (बेलवंडी)
  3. दुसरं गोल रिंगण – 2 जुलै 2022 (इंदापूर)
  4. तिसरं गोल रिंगण – 5 जुलै 2022 (अकलूज माने विद्यालय)
  5. हे सुद्धा वाचा
  6. पहिलं उभं रिंगण – 6 जुलै 2022 (माळीनगर)
  7. दुसरं उभं रिंगण – 8 जुलै 2022 (बाजीराव विहीर)
  8. तिसरं उभं रिंगण – 9 जुलै 2022 (पादुका आरती)

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.