अनंत चतुर्दशी ते पितृ पक्ष आणि संकष्टी श्री गणेश चतुर्थी व्रत, आठवड्यातील सणांबद्दल घ्या जाणून

Saptahik Vrat List: अनंत चतुर्दशी ते पितृ पक्ष आणि संकष्टी श्री गणेश चतुर्थी व्रत... 'या' आठवड्यातील महत्त्वाच्या सणांबद्दल घ्या जाणून... कोणत्या दिवशी आहे खास मुहूर्त आणि खास योग...

अनंत चतुर्दशी ते पितृ पक्ष आणि संकष्टी श्री गणेश चतुर्थी व्रत, आठवड्यातील सणांबद्दल घ्या जाणून
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 8:02 AM

हिंदू धर्मामध्ये सण, उत्साहाला फार महत्त्व आहे. आज अनंत चतुर्दशी म्हणजे लाडक्या बाप्पा निरोप देण्याचा दिवस. 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर भक्त आज गणरायचं विसर्जन करतील. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात पितरांच्या नावाने श्राद्ध, पिंड दान करण्याची परंपरा आहे. पितृ पक्षासोबतच या आठवड्यात विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाच्या चतुर्थी तिथीलाही उपवास केला जातो. सांगायचं झालं तर, हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. सप्टेंबरच्या या आठवड्यातील प्रमुख उपवास सणांबद्दल जाणून घेऊया…

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी असते. असं मानलं जातं, की या दिवशी विधीपूर्वक श्री हरीची पूजा केल्यास 14 वर्षांपर्यंत अनंत फळ मिळते. पंचांगानुसार, पांडवांनी भगवान कृष्णाच्या प्रेरणेने अनंत चतुर्दशीचे व्रत केले होते आणि ज्यामुळे त्यांना गमावलेले राज्य देखील परत मिळालं.. असं मानलं जातं.

पितृ पक्ष प्रारंभ (18 सप्टेंबर, बुधवार)

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला श्राद्ध केले जाते. प्रतिपदा तिथीला आपल्या पितरांच्या उद्धारासाठी आणि समाधानासाठी, पितृदोषापासून मुक्तीसाठी प्रतिपदा श्राद्ध करण्याची प्रथा आहे. प्रत्येक मनुष्यावर तीन प्रकारचे ऋण असतात, पहिले देवाचे ऋण, दुसरे ऋषींचे ऋण, तिसरे पितृ ऋण. पितृपक्षात श्राद्ध केल्याने व्यक्तीला तीन ऋणांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतं.

द्वितीया तिथी श्राद्ध (19 सप्टेंबर, गुरुवार)

या दिवशी अश्विन कृष्ण पक्षाच्या द्वितीय तिथीला श्राद्ध केलं जातं… असं म्हणतात. ज्या व्यक्तींचा मृत्या ज्या तिथीला झाला आहे. त्याच तिथीला श्राद्ध करावं… अशी देखील मान्यता आहे. द्वितीया तिथीच्या श्राद्धाला दूज श्राद्ध असेही म्हणतात. पितृ पक्षाचा काळ पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

तृतीया तिथीचं श्राद्ध (20 सप्टेंबर, शुक्रवार)

हिंदू पंचांगानुसार, अश्विन कृष्ण पक्ष तृतीया तिथीला श्राद्ध केलं जातं. योगायोगाने पंचक देखील याच 20 सप्टेंबर रोजी 9:26 वाजता समाप्त होईल. शास्त्रानुसार देवतांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने प्रथम आपल्या पितरांना प्रसन्न केले पाहिजे. असे केल्याने देवांचा आशीर्वाद राहतो आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते… असं देखील म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.