Sarva Pitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय, पितरांच्या आशीर्वादाने अपूर्ण कामं होतील पूर्ण
सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पिंड दान, तर्पण आणि त्या व्यक्तीचे श्राद्ध केले जाते ज्याची श्राद्धाची तारीख आपल्याला माहित नाही. जर तुम्ही सतत आर्थिक समस्यांशी झुंजत असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास फायदा होऊ शकतो.
हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येचे सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. ही तिथी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरी केली जाते. या दिवशी पिंडदान किंवा तर्पण त्या सर्व पितरांसाठी केले जाते ज्यांची मृत्यूची तिथी माहित नाही किंवा काही कारणास्तव ज्यांचे श्राद्ध पूर्वी करता आले नव्हते. म्हणून ती सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदाची सर्वपित्री अमावस्या विशेष महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहणही होणार आहे. अशा स्थितीत या दिवशी श्राद्ध करणे शुभ ठरेल का?
पितृ पक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणे, श्राद्धाची तिथी आणि पिंड दान अर्पण करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व दिले जाते.या दिवशी केलेला कोणताही उपाय प्रभावी मानला जातो. या वेळी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.
पंचागानुसार, या वर्षी सर्वपित्री अमावस्येची तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 40 मिनिटांपासून ते 2 ऑक्टोबर दुपारी 2 वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या देखील म्हटले जाते. उदय तिथीनुसार अमावस्या तिथी 2 ऑक्टोबरलाच असेल.
या दिशेकडे द्या विशेष लक्ष
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा पवित्र मानली जाते. हे देवतांचे निवासस्थान मानले जाते. या काळात पितरांची पूजा आणि स्मरण करावे आणि घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेने दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. घरात पैसा येतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते.
लक्ष्मी मातेसमोर लावा तुपाचा दिवा
सर्वपित्री अमावस्येचा अर्थ म्हणजे पितरांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे. या दिवशी पूजा आणि दानाचे फळ आपल्याला मिळते. यावेळी लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा १०८ वेळा जप करावा. त्यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुळशी माळेचा 21 वेळा जप करावा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)