2025 मधील दुसरे चंद्रग्रहण कधी आहे? ‘या’ गोष्टी ग्रहणाच्या दिवशी टाळा
2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 14 मार्च रोजी झाले आहे आणि चंद्रग्रहण 29 मार्च रोजी आहे. आता सर्वांना पुढील चंद्रग्रहणाची वाट पाहत आहे. याशिवाय, हे ग्रहण भारतात होईल की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील आहे.

हिंदू धर्मामध्ये चंद्र ग्रहणाच्या दिवशी चांगल्या गोष्टी करू नये. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी कोणतेही चांगले काम केल्यास तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडथळे येतात. 2025 मध्ये चार ग्रहणे होणार आहेत, त्यापैकी 2 आधीच होऊन गेली आहेत. पहिले चंद्रग्रहण १४ मार्च रोजी झाले होते तर सूर्यग्रहण 29 मार्च रोजी झाले होते. तथापि, हे दोन्ही ग्रहण भारतात दिसले नाहीत. आता लोक पुढील दोन ग्रहणांची वाट पाहत आहेत. तसेच, यावेळी भारतात ग्रहण दिसेल की नाही हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. तर चला तर मग जाणून घेऊया वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कधी होईल आणि ते भारतात दिसेल की नाही.
चंद्र ग्रहणाच्या दिवशी महत्त्वाचे काम केल्यामुळे तुमची प्रगती होत नाही. त्यासोबतच चंद्र ग्रहणा दरम्यान गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होईल. भाद्रपद पौर्णिमा या दिवशी असेल. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण 8 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 ते 12:23 पर्यंत राहील. चला तर जाणून घेऊयात चंद्र ग्रहणाच्या दिवशी काय गोष्टी करू नये चला जाणून घेऊया.
धार्मिक ग्रंथानुसार, 2025 सालचे पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही भारतात दिसले नाहीत, परंतु यावेळी हे ग्रहण भारतात दिसणार आहे. अशा परिस्थितीत, सुतक कालावधी देखील वैध असेल. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड, अमेरिका आणि आफ्रिकेतही दिसेल. चंद्र ग्रहणा दरम्याण, सुतक काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करू नये. तुम्ही धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करू शकता. या काळात मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा.
सुतक सुरू होईपर्यंत अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये. तसेच तयार केलेल्या अन्नात तुळस किंवा कुश घाला आणि झाकून ठेवा. सुतक काळ संपल्यानंतर, घरात गंगाजल शिंपडावे. याशिवाय, सुतक काळात गर्भवती महिलांसाठी काही वेगळे नियम देण्यात आले आहेत, त्यानुसार गर्भवती महिलेने सुतक काळात बाहेर जाऊ नये, झोपू नये आणि शिवणकाम किंवा विणकाम यासारख्या तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत. चंद्रग्रहणाच्या वेळी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, जसे की अन्न सेवन, शुभ कार्ये, आणि काही विशिष्ट कामांचे करणे. या काळात राग टाळणे आणि शांत राहणे महत्त्वाचे आहे. ग्रहण काळात अन्न किंवा पाणी पिणे टाळावे, कारण ते अशुभ मानले जाते.
चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये किंवा पूजा-पाठ करू नये. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणतेही नवीन काम सुरू करू नये, कारण या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त असते. चंद्रग्रहणाच्या वेळी राग किंवा नकारात्मक विचार टाळावे, कारण त्यामुळे पुढील 15 दिवस त्रासदायक होऊ शकतात. ग्रहण काळात कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा स्मशानभूमीजवळ जाऊ नये. कात्री, सुया, चाकू यांसारख्या धारदार वस्तूंनी काम करणे टाळावे. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर जाणे, विशेषतः कामाचे करणे टाळावे.
‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा…..
- या काळात आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा.
- चंद्रग्रहण नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, असे मानले जाते, त्यामुळे या काळात शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.
- ग्रहण संपल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करणे आवश्यक आहे.
- चंद्रग्रहण काळात देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये.
- ग्रहण काळात शक्य झाल्यास घराबाहेर जाणे टाळावे.
- ग्रहण संपल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी गंगाजल शिंपडावे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.