Secret Of Death | मृत्यूनंतर नक्की होतं तरी काय ? मृत्यूची जाणीव कशी होते, गरुड पुराणात दिलेले उत्तर जाणून घ्या
माणसाचा जन्म मृत्यूच्या मधली राहिलेली वेळ असतो. आपल्या पैकी बरेच जण मृत्यूला घाबरतात. पण मृत्यू शाश्वत आहे. जगात जर काही सत्य असेल तर तो मृत्यू आहे. हिंदू धर्मातील गरुड पुराणात माणसाच्या मृत्यूची सर्व रहस्य सांगण्यात आली आहेत.
मुंबई : माणसाचा जन्म मृत्यूच्या मधली राहिलेली वेळ असतो. आपल्या पैकी बरेच जण मृत्यूला घाबरतात. पण मृत्यू शाश्वत आहे. जगात जर काही सत्य असेल तर तो मृत्यू आहे. हिंदू धर्मातील गरुड पुराणात माणसाच्या मृत्यूची सर्व रहस्य सांगण्यात आली आहेत. मृत्यूनंतर नक्की होतं तरी काय ? मृत्यूची जाणीव कशी होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात. भारतातील मुख्य पुराणांमध्ये गरुड पुराणाचा समावेश होतो.या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्री हरि यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत (What Happen To The Soul After Death According To Garuda Purana).
तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी अपरिचीत या चित्रपटात गरुड पुराण याबद्दल ऐकलं असेल. माणसांच्या प्रत्येक वाईट कृत्यांचा शिक्षा गरुड पुराणामध्ये देण्यात आली आहे. जर तुमची कृत्य चांगली असतील तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळते या उलट तुमची कृत्य वाईट असतील तर वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते. गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय. गरुड पुराणात, जीवन-मृत्यू आणि मृत्यू नंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत. स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत, हे सांगता येत नाही. परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केले आहे की आत्मा कधीही संपत नाही.
आत्मा प्रथम यमलोकात जाते गरुड पुराणानुसार, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात. यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या-वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात. यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेले. 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही, परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत, त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात. अशी मान्यता आहे
13 दिवसानंतर पुढचा प्रवास निश्चित होतो गरुड पुराणानुसार, 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते. यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात. स्वर्ग लोक, पितृ लोक आणि नरक लोक. व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते. पहिला मार्ग अर्चि म्हणजेच देवलोकचा प्रवासाचा मार्ग मानला जातो. दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे. पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते.
मृत्यूची चाहूल अशी होते.
नाभीचक्रात तुटायला सुरुवात होते धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला की, मृत्यूवेळी सर्वांत पहिल्यांदा नाभी चक्रात वेग येतो. नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र तुटतं. नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते. कारण, येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते. येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो. त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभीचक्रात जाणवतो. हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही. त्याला खूप वेळ लागतो. जसजसा नाभीचक्र तुटत जातो, तसतसा मृत्यू जवळ येत राहतो. तसं पाहिलं तर, मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात, याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात केलेले आहेत. त्यामध्ये गरुड पुराण, सूर्य अरुण संवाद, समुद्रशास्त्र आणि कापालिक संहिता, या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने याबद्दल उल्लेख दिसतो.
नाक दिसणं बंद होतं या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की, मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात. त्यातून समजतं की, शरीराचा त्याग करण्याची वेळ जवळ आली आहे. या ग्रंथांमध्ये मृत्यूपूर्वी मुख्य संकेत असा सांगितला आहे की, मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणं बंद होतं.
मृत्यूनंतर आत्म्याचं काय होते मृत्यू नंतर आत्मा कोठे अदृश्य होतो या प्रश्नाचे नेहमीच वेगळे वर्णन केले जाते. तथापि, एक गोष्टीत एकत्रित आहेत: संपूर्ण हृदयविकारानंतर, एखादी व्यक्ती नवीन स्थितीत राहते. मृत्यूनंतर 13 दिवसतर आत्म पृथ्वीवरच असतो. आपण मेलो आहेत हे समजून घेण्यासाठीच माणसाला खूप वेळ लागतो. मृत माणसाचा आत्मा 13 दिवस त्यांच्या जवळच्या लोकांच्या आसपास असतो.
Chanakya Niti | आयुष्यात या 7 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर नेस्तनाबूत व्हाल !
24 January 2022 Panchang | 24 जानेवारी 2022, सोमवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ