Shani Amavasya: शनिची साडेसाती लागलीय? 27 ऑगस्ट महत्त्वाचा दिवस.. दोन विशेष योग, वाचा सविस्तर!
या शुभ योगामध्ये शनिदेवाची उपासना, उपाय केले जातात. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 26 ऑगस्ट, गुरुवारी 12:24 पासून सुरू होईल, जी शनिवार 27 ऑगस्ट रोजी 01:47 पर्यंत राहील.
Shani Amavashya: अमावास्येला पितरांची तिथी मानली जाते. यावेळी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या 27 ऑगस्ट, शनिवारी येत आहे. या अमावास्येला पुराणात कुशाग्रही अमावस्या (Kushagrahi Amavasya) असे म्हटले आहे. शनिवारी येणार्या या अमावस्यामुळे याला शनी अमावस्या म्हणतात. या शुभ योगामध्ये शनिदेवाची उपासना, उपाय केले जातात. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 26 ऑगस्ट, गुरुवारी 12:24 पासून सुरू होईल, जी शनिवार 27 ऑगस्ट रोजी 01:47 पर्यंत राहील. अमावस्या तिथीचा सूर्योदय 27 ऑगस्ट रोजी होणार असल्याने अमावस्याशी संबंधित सर्व उपाय, पूजा इत्यादी देखील याच दिवशी कराव्यात. या दिवशी पद्म आणि शिव नावाचे 2 शुभ योग देखील जुळून येत आहे.
या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व
अमावस्या ही पितरांची तिथी आहे. त्यामुळे या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण वगैरे करण्याची परंपरा आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्यांनी या दिवशी काही विशेष उपाय केल्यास या दोषाचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो. यावेळी शनिचरी अमावस्येच्या योगामुळे हा दिवस अधिकच विशेष बनला आहे. यावेळी ज्यांना शनीची साडेसाती आणि ढय्याचा त्रास होतो, त्यांनी या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास त्यांचा त्रासही कमी होऊ शकतो.
या अमावस्येला कुशाग्रही का म्हणतात?
भाद्रपद महिन्यातील अमावस्याला कुशग्रही अमावस्या म्हणतात कारण या तिथीला कुश नावाच्या गवताचा गोळा करण्याची परंपरा आहे जी पूजेत वापरली जाते. कुश गवताळ दर्भसुद्धा म्हणतात. वैदिक विधी करणारे या तिथीला कुश गवत म्हणजेच दर्भ गोळा करतात जेणेकरून वेळ आल्यावर त्याचा वापर करता येईल. श्राद्ध विधी करताना दर्भाची अंगठी घालण्याची पद्धत आहे. कुशापासून बनवलेली आसने देखील खास मंत्रोच्चारासाठी वापरली जातात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)