shani amavasya 2025: शनी अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये जाणून घ्या….
Shani Amavasya Significance: हिंदू धर्मात शनि अमावस्या खूप विशेष मानली जाते. शनिदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी शनिदेवाची पूजा करतो, त्याचे सर्व संकटे दूर होतात.

मान्यतेनुसार, आमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम करत नाही. या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते. हिंदू धर्मामध्ये अक अशी आमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते. आमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे त्यांचा आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. एका वर्षभरामध्ये एकुण 12 आमावस्या असतात. शनिवारी येणाऱ्या आमावस्येला शनि किंवा शनिश्री आमावस्या म्हटले जाते. हिंदू धर्म ग्रंथांनुसार, शनि आमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. या दिवशी शनि देवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
धार्मिक मान्यतेनुसार, शनि अमावस्येच्या दिवशी खऱ्या भक्तीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते. आयुष्यातील अडथळे दूर होतात. पृथ्वी आणि ग्रह दोषांपासूनही मुक्तता मिळते. हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही नियमांचे पालन करण्याचेही सांगितले आहे. अशा परिस्थितीत, या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया.
या वर्षी शनि अमावस्या 29 मार्च रोजी साजरी केली जाईल. हा चैत्र महिन्याचा अमावस्या दिवस असेल. या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होईल. या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील. चैत्र महिन्यातील अमावस्या 28 मार्च रोजी संध्याकाळी 8:55 वाजता सुरू होईल आणि 29 मार्च रोजी दुपारी 4:27 वाजता संपेल. म्हणून, उदय तिथीनुसार, शनी अमावस्या 29 मार्च रोजी असेल. या वर्षीची ही पहिली शनी अमावस्या असेल. शनि अमावस्येच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळा. वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अनादर करू नका. या दिवशी गायी, कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नका. असे करणे चांगले मानले जात नाही. केस, दाढी आणि नखे कापू नका. यामुळे ग्रह दोष निर्माण होऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नका. लोखंडी वस्तू आणि शनिशी संबंधित वस्तू खरेदी करू नका.
आमावस्येच्या दिवशी लग्न, मुंडन, साखरपुडा किंवा इतर शुभ कार्ये करू नये. आमावस्येला मांस, मद्य आणि इतर तामसिक पदार्थांचे सेवन टाळा. आमावस्येच्या दिवशी कुत्र्या, गाय आणि कावळ्या यांना त्रास देऊ नका. या दिवशी नखे, दाढी आणि केस कापणे टाळा असे केल्यास नकारात्मक परिणाम होतो. आमावस्येला तुळशीला पाणी देऊ नका. या दिवशी घरात किंवा आजूबाजूला घाण करू नका. आमावस्येला राग किंवा इतरांचा अनादर करणे टाळा