वर्ष 2025 मध्ये ‘या’ राशींमागे साडेसती आणि अडीचकी, कोणते कोणते नुकसान होणार?
शनिदेव जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि अडीचकी सुरू होतात, तेव्हा त्याचा प्रभाव काहींवर संपतो. अडीचकी म्हणजे शनिदेवचा एक प्रभाव, अडीच वर्षाचा असतो. अडीचकी म्हणजेच अडीच वर्ष.
नवीन वर्ष 2025 चे स्वागत करण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत . याचवेळी काही महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मदाता म्हटले जाते. शनीच तुम्हाला तुमच्या कर्मांचे फळ देतो. शनी केवळ माणसाला त्याने केलेल्या कर्मांचेच फळ देतो, म्हणून त्याला न्यायाधीश असेही म्हणतात. शनि ग्रहाला वय, दु:ख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानले आहे. तसेच शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. तसेच तूळ ही शनीची उच्च राशी आहे तर मेष ही त्याची दुर्बल राशी मानली जाते. शनी देव सुमारे अडीच वर्षांनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत आहेत.
शनिदेव जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि अडीचकी सुरू होतात, तेव्हा त्याचा प्रभाव काहींवर संपतो. वर्ष 2025 च्या सुरुवातीला शनी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे काही राशींवर साडेसती आणि अडीचकी प्रभाव सुरू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, हे बदल काही राशींवर शुभ-अशुभ प्रभाव दाखवू शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत
‘या’ राशींवर सुरू होणार साडेसाती
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2025 मध्ये शनी आपल्या कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर गुरूचे संक्रमण होताच मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपुष्टात येईल आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होणार आहे. तर मीन राशीवर दुसऱ्या टप्प्याचा, तर कुंभ राशीवर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा परिणाम होणार आहे.
‘या’ राशींवर होणार अडीचकीची सुरुवात
नवीन वर्षात जेव्हा शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे तेव्हा शनीचा अडीचकी वृश्चिक राशीत संपेल आणि धनु राशीत सुरू होईल. तर कर्क राशीसाठी कंटक शनीचा प्रभाव संपुष्टात येणार आहे, तर सिंह राशीसाठी हा प्रभाव सुरू होईल.
साडेसातीचा मेष राशीवर होणारा परिणाम
शनी साडेसात वर्षे मेष राशीत राहणार आहे. या साडेसातीचे त्याचे तीन टप्पे आहेत, प्रथम चढती साडेसाती, मध्यमा साडेसाती आणि उतरती साडेसाती. या तीन अवस्थांमध्ये शनीचा प्रभाव वेगवेगळा असतो. मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्याही येऊ शकतात. एखादा मोठा आजारही उद्भवू शकतो. त्यामुळे साडेसातीच्या मध्यभागी मेष राशीसाठी वेळ थोडा कठीण जाईल. यावेळी मेष राशीचे जातकांना मानसिकरित्या अस्वस्थता अनुभवावी लागणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)