2025मध्ये या राशींचे चमकू शकते नशीब, करिअर आणि व्यवसायात प्रगतीसह कमवाल भरपूर पैसे

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो.

2025मध्ये या राशींचे चमकू शकते नशीब, करिअर आणि व्यवसायात प्रगतीसह कमवाल भरपूर पैसे
Rashi_Chakra
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 7:16 PM

ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा स्वभाव सर्वात क्रूर मानला जातो. पण जर शनी तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुमचे नशीब चमकू शकते. शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी शनिच्या साडेसती किंवा अडीचकीच्या प्रभावाला सामोरे जावे लागते. याशिवाय शनी हा आपल्या स्थितीनुसार शुभ-अशुभ परिणाम देतो. शनीची राशी बदलल्याने तो चंद्रराशीत कोणत्या घरात विराजमान आहे यावरून ते ठरवले जाते. शनी वर्ष 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशावेळी काही राशींच्या कुंडलीत शनी त्यांचे करिअर तसेच पैश्यांची भरभराट होणार आहे.व या राशींना विशेष लाभ मिळू शकतो. कोणत्या आहेत ह्या राशी जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील व्यक्तीच्या जन्मराशीपासून शनी दुसऱ्या, पाचव्या आणि नवव्या भावात असेल तर या राशीच्या लोकांना विशेष प्रभावाचा लाभ मिळू शकतो. 2025 मध्ये शनी मीन राशीत गेल्याने या तीन राशींना बंपर लाभ मिळणार असून 2027 पर्यंत ते या राशीत राहणार आहेत.

कुंभ रास

या राशीत शनी दुसऱ्या भावात राहणार आहे. अशा तऱ्हेने शनी या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळवून देऊ शकतो. 2025 या वर्षात तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरदारांना विशेष लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतील. यामुळे 2027 सालापर्यंत तुम्ही रोजगारापासून वंचित राहणार नाही. मोठा नफा होऊ शकतो. त्याचबरोबर पदोन्नतीसह पगारवाढ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. सरकारी कामात सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येतील. त्याचबरोबर अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सुखे येऊ शकतात.

वृश्चिक रास

शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करेल. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. कष्टाचे गोड फळ मिळेल. जुने वाद मिटतील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणामकारक ठरेल. या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. यासोबतच अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.