साध्वी हर्षा रिछारियावर शंकराचार्य भडकले, थेट सुनावत म्हटले, ‘महाकुंभात…’

Sadhvi Harsha Richhariya Controversy: सोशल मीडियावर 13 जानेवारी रोजी त्यांचे 667K फॉलोअर्स होते. त्यानंतर एका दिवसांत 14 जानेवारी रोजी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली. त्यांचे फॉलोअर्स एक मिलियनपर्यंत पोहचले. एका दिवसांत त्यांचे 3 लाख 33 हजार फॉलोअर्स वाढले.

साध्वी हर्षा रिछारियावर शंकराचार्य भडकले, थेट सुनावत म्हटले, 'महाकुंभात...'
साध्वी हर्षा रिछारिया आणि शंकराचार्य
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 2:43 PM

Sadhvi Harsha Richhariya Controversy: प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभातील बातम्यांमध्ये सर्वाधिक चर्चा साध्वी रिछरियावर होत आहे. मॉडल आणि एंकर असलेल्या हर्षा रिछारिया दोन वर्षांपूर्वी साध्वी बनल्या. प्रयागराजमधील महाकुंभात त्यांच्याबाबत नवीन वाद समोर आला आहे. हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्नान करु देणे आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले की, महाकुंभात ही परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. ही विकृत मानसिकता आहे. महाकुंभात चेहरेचे सौदर्यं नाही तर ह्रदयाची सुंदरता पाहिली जावी. मनाची सुंदरता पाहिली जावी. ज्याने अजून संन्यास घ्यावा की लग्न करावे, हे निश्चित केले नाही, त्यांना संत-महात्मांच्या शाही रथावर स्थान देणे चुकीचे आहे. भक्त म्हणून त्यांचा सहभाग ठीक आहे, पण भगवे कपडे परिधान करुन शाही रथावर बसणे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रमाणे पोलिसांचा गणवेश केवळ पोलीस दलात सहभागी असणाऱ्यांना मिळतो, तसे भगवे वस्त्र फक्त संन्यासींना मिळते.

सर्वात सुंदर साध्वीची महाकुंभात चर्चा

हर्षा रिछारिया निरंजनी अखाडेचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची शिष्या आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा या स्वाधी होण्यासोबत एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांचे फॅन त्यांना महाकुंभ 2025 फेम असा किताब देत आहे. एका रात्रीत त्या प्रचंड प्रसिद्ध झाल्या. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होणे आणि फॉलोअर्स वाढले आहे. महाकुंभ 2025 मध्ये आलेल्या सर्वात सुंदर साध्वी त्यांना म्हटले जात आहेत

हे सुद्धा वाचा

इंस्टावर वाढले फॉलोअर्स

साध्वी हर्षा यांनी सांगितले, सोशल मीडियावर 13 जानेवारी रोजी त्यांचे 667K फॉलोअर्स होते. त्यानंतर एका दिवसांत 14 जानेवारी रोजी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली. त्यांचे फॉलोअर्स एक मिलियनपर्यंत पोहचले. एका दिवसांत त्यांचे 3 लाख 33 हजार फॉलोअर्स वाढले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.