Navratri 2021 : नवरात्रीत कन्या पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या, सर्व इच्छा पूर्ण होतील
हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान, देवी दुर्गाची नऊ रुपांमध्ये पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमीच्या दिवशी 10 वर्षाखालील मुलींची देवी म्हणून पूजा केली जाते. कन्या पूजनामध्ये नऊ देवींचे प्रतिबिंब म्हणून देवी दुर्गाची पूजा केली जाते. यानंतरच नवरात्रीच्या दिवसाची पूजा पूर्ण मानली जाते. कन्या पूजेशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया -
मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान, देवी दुर्गाची नऊ रुपांमध्ये पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमीच्या दिवशी 10 वर्षाखालील मुलींची देवी म्हणून पूजा केली जाते. कन्या पूजनामध्ये नऊ देवींचे प्रतिबिंब म्हणून देवी दुर्गाची पूजा केली जाते. यानंतरच नवरात्रीच्या दिवसाची पूजा पूर्ण मानली जाते. कन्या पूजेशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया –
पूजेची पद्धत
नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा केली जाते. यासाठी मुलीला एक दिवस अगोदर आमंत्रित दिले जाते. मुलींना आरामदायक आणि स्वच्छ ठिकाणी बसवा आणि त्यानंतर त्यांचे हात-पाय आपल्या हाताने धुवा आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या. यानंतर कपाळावर अक्षत आणि कुंकु लावा. मग या मुलींना पुरी, हलवा, चणा, खीर यांचे जेवण बनवा आणि तुमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या.
कन्या पूजेमध्ये मुलींला जेवण द्या. मुलाला बटुकचे प्रतीक मानले जाते. देवी पूजनानंतर भैरवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
कन्या पूजेचे महत्त्व
मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी तेवढी प्रसन्न होत नाही जेवढी कन्या पूजा केल्याने होते. कन्या पूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
कन्या पूजेत या गोष्टी लक्षात ठेवा
? 2 ते 10 वर्षांच्या मुलींना कन्या पूजेत आमंत्रित करा. पूजेपूर्वी घरात स्वच्छता असावी हे लक्षात ठेवा.
? दोन वर्षांच्या मुलीची पूजा केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
? 3 वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते. त्रिमूर्तीची पूजा केल्याने घरात धन आणि अन्न येते.
? चार वर्षांची मुलगी कल्याणी मानली जाते.
? पाच वर्षांच्या मुलीला रोहिणी म्हणतात. त्यांची पूजा केल्याने रोग आणि दुःख दूर होतात.
? सहा वर्षांच्या मुलीला कालिका रुप म्हणतात. कालिका रुपातून ज्ञान आणि विजय प्राप्त होतो. सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात.
? आठ वर्षांच्या मुलीला शांभवी म्हणतात.
? नऊ वर्षांच्या मुलीला देवी दुर्गा म्हणतात.
? दहा वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात.
Shardiya Navratri 2021 : महाअष्टमीला दुर्गा देवीला प्रसन्न करायचं असेल तर हे महाउपाय करा, घरात सुख-समृद्धी येईलhttps://t.co/IOQGiejtgl#ShardiyaNavratri2021 #navratri2021 #Durgamata #DurgaAshtami
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shardiya Navratri 2021 : अष्टमीच्या दिवशी देवी महागौरीची पूजा कशी करावी, जाणून घ्या