Shardiya Navratri 2021 : नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व
नवरात्रीचा पवित्र उत्सव आजपासून 7 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे असतात. असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये जो दुर्गा मातेची मनापासून पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या नऊ दिवसांसाठी देवी दुर्गाची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा केली जाते.
मुंबई : नवरात्रीचा पवित्र उत्सव आजपासून 7 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे असतात. असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये जो दुर्गा मातेची मनापासून पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या नऊ दिवसांसाठी देवी दुर्गाची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा केली जाते.
घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला नवरात्रीला सुरुवात होते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नवरात्रोत्सव गुरुवार 07 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यावेळी नवरात्रीत दोन तिथी पडल्यामुळे 8 दिवसांची आहे.
नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. वर्षात चार वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्र हे असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रामध्ये त्याच्याशी संबंधित दोन पौराणिक कथा प्रचलित आहेत. पौराणिक इतिहास आणि नवरात्रीचे महत्त्व जाणून घेऊया –
पहिली कथा –
पहिल्या आख्यायिकेनुसार, देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. ज्याने ब्रह्माजींना त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न केले होते. महिषासुराने ब्रह्माजींकडे वरदान मागितले होते की कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवर राहाणारा व्यक्ती त्याला मारु शकणार नाही. ब्रह्माजींच्या वरदानानंतर त्याने पृथ्वीवर दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गा देवीचा जन्म झाला. देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला.
दुसरी कथा –
दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, रामाने रामेश्वरम येथे नऊ दिवस देवी दुर्गाची पूजा केली होती. देवी दुर्गा प्रसन्न झाली आणि श्री रामाला विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर, दहाव्या दिवशी रामाने रावणाशी युद्ध करत त्याचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला, म्हणून दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
Shardiya Navratri 2021 : नवरात्रीला विशेष संयोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्वhttps://t.co/99hgxlcRsL#ShardiyaNavratri2021 #KanyaPuja #navratri2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shardiya Navratri 2021 | नवरात्रीचे उपवास करताय? मग या गोष्टी जाणून घ्या