Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत या पाच वस्तू खरेदी करणे मानले जाते शुभ, मिळतो देवीचा आशिर्वाद
Shardiya Navratri 2023 नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या शुभ दिवसांमध्ये सकाळ-संध्याकाळ आरती आणि मंत्रजप केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते.
मुंबई : या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होत आहे. त्याची सांगता 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला होईल. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या शुभ दिवसांमध्ये सकाळ-संध्याकाळ आरती आणि मंत्रजप केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. दरम्यान, अनेक प्रकारचे विधी आणि धार्मिक कार्य केले जातात. तसेच या काळात काही वस्तू खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल.
नवरात्रीमध्ये या वस्तू करा खरेदी
कलश : कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवातही कलशाच्या स्थापनेने होते. अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा, पितळाचा, चांदीचा किंवा सोन्याचा कलश घरी आणू शकता.
दुर्गा देवीची मूर्ती : नवरात्री माता दुर्गाला समर्पित आहे. अशा स्थितीत या नवरात्रीत, आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती विकत घ्या आणि तिची विधीवत पूजा करा. नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करत रहा. यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील.
देवीची पाऊलं: यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पावलांचे ठसे विकत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची पूजा करा. देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात. त्यांचे पूजन केल्याने घरात शुभता कायम राहते. पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नयेत. असे केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे पाय त्यावर पडतात आणि त्यामुळे देवीचा अपमान होतो. त्यामुळे पूजास्थळाजवळच देवीची पाऊलं ठेवीत.
दुर्गा बिसा यंत्र: दुर्गा बिसा यंत्र हे अत्यंत चमत्कारी साधन मानले जाते. सिद्ध दुर्गाबिसा यंत्र सोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही असे शास्त्रांमध्ये मानले जाते. तसेच सर्व प्रकारच्या वाईट दिवसांपासून रक्षण करते. नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाबिसा यंत्र नक्कीच घरी आणा.
ध्वज: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा. हे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीच्या काळात हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि नऊ दिवस त्याची पूजा करा. त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेवून ठेवावा. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)