Shardiya Navratri 2023 : या तारखेपासून सुरू होणार शारदीय नवरात्र, जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त
हिंदू धर्मात नवरात्री वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते. 2 प्रत्यक्ष नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्र आहेत. यामध्ये अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीचा (Shardiya Navratri 2023) सण खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात नवरात्री वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते. 2 प्रत्यक्ष नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्र आहेत. यामध्ये अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यामध्ये दुर्गा मातेच्या मूर्ती विराजमान केल्या जातात, गरबा, रामलीलाचे आयोजन केले जाते. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत उपवास केला जातो.
शारदीय नवरात्र कधीपासून आहे?
शारदीय नवरात्रोत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो. त्यानंतर दसरा साजरा केला जाईल. दुसरीकडे, घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते, 9 दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023, रविवारपासून होत आहे आणि 23 ऑक्टोबर 2023, मंगळवारी संपेल. दुसरीकडे, 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे.
आश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.24 वाजेपासून सुरू होईल आणि 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12.32 पर्यंत राहील. उदय तिथीनुसार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.
कलश स्थापना मुहूर्त
पंचांगानुसार शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच पहिल्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 पर्यंत कलश लावण्याचा शुभ मुहूर्त आहे. अशा स्थितीत कलश उभारण्यासाठी यंदा अवघा ४६ मिनिटांचा अवधी राहणार आहे.
नवरात्रीचे 9 दिवस आणि माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा
- नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा – 15 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा – 16 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा – 17 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडाची पूजा – 18 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई स्कंदमातेची पूजा – 19 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा – 20 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा – 21 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा – 22 ऑक्टोबर 2023
- नवरात्रीच्या नवव्या दिवशी महागौरीची पूजा – 23 ऑक्टोबर 2023
- विजयादशमी किंवा दसरा सण – 24 ऑक्टोबर 2023
शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व
पौराणिक कथेनुसार, शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला, म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले. यानंतर, दहाव्या दिवशी राक्षसाचा वध झाला, म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)