Shattila Ekadashi 2023: उद्या षटतीला एकादशी, काय आहे या एकादशीचे महत्व?

यावर्षी षटतीला एकादशीचे व्रत 18 जानेवारीला म्हणजेच उद्या पाळले जाणार आहे. या व्रताचे कोणकोणते नियम आहेत ते जाणून घेउया.

Shattila Ekadashi 2023: उद्या षटतीला एकादशी, काय आहे या एकादशीचे महत्व?
एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:32 AM

मुंबई, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशीचे (Shatatila Ekadashi 2023) व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि नियमानुसार उपवास केल्याने इच्छित फळ मिळते, असे सांगितले जाते. या दिवशी जो साधक भगवान विष्णूंना तीळ अर्पण करतो, तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. यावर्षी षटतीला एकादशीचे व्रत 18 जानेवारीला म्हणजेच उद्या पाळले जाणार आहे. या व्रताचे कोणकोणते नियम आहेत ते जाणून घेउया.

षटतीला एकादशीला या चुका करू नका

1. षटतीला एकादशीच्या दिवशी वांगी आणि तांदूळाचे सेवन करू नये. 2. या दिवशी मांस, मद्य आणि मद्यपान करू नका आणि ब्रह्मचर्य पूर्णत: पाळा. 3. उपवासाचे व्रत घेणाऱ्या साधकाने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे, विश्रांती घ्यावी. 4. षटतीला एकादशीच्या दिवशी वाईट शब्द उच्चारू नका. खोटे बोलणे टाळा. 5. षटतीला एकादशीच्या दिवशी झाडाची फुले, पाने किंवा डहाळे तोडू नका.

हे सुद्धा वाचा

हे काम एकादशीला अवश्य करावे

  1. षटतीला एकादशीला तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तिळापासून बनवलेल्या वस्तूही दान करू शकता.
  2.  या दिवशी श्री हरी भगवान विष्णूला तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूला तीळ अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे म्हणतात.
  3.  ज्या व्यक्तीने षटतीला एकादशीचे व्रत घेतले असेल त्यांनी उकडलेले तीळ लावावे आणि पाण्यात तीळ टाकून स्नान करावे.
  4.  षटतीला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तीळ अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.

एकादशीचा महिमा

वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. वैदिक शास्त्रात एकादशीचे व्रत हे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे व्रत मानले गेले आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, एकादशीच्या उपवासाचा थेट परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. या व्रताने चंद्राचा प्रत्येक नकारात्मक प्रभाव थांबवला जाऊ शकतो. या व्रताने ग्रहांचा प्रभावही बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.