AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sheetala Ashtami 2021 | शीतला अष्टमी व्रताने आरोग्य, आर्थिक समस्या सुटतील, देवीला शिळ्या पदार्थाचा नैवेद्य का?

चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी ही शीतला अष्टमी म्हणून साजरी (Sheetala Ashtami 2021) केली जाते.

Sheetala Ashtami 2021 | शीतला अष्टमी व्रताने आरोग्य, आर्थिक समस्या सुटतील, देवीला शिळ्या पदार्थाचा नैवेद्य का?
Sheetala Ashtami
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 11:19 AM

मुंबई : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी ही शीतला अष्टमी म्हणून साजरी (Sheetala Ashtami 2021) केली जाते. उत्तर भारतात या दिवशी देवी शीतलाचं पूजन केलं जातं. त्यांना शिळ्या जेवणाचं नैवेद्य लावलं जाते. यामुळे या शीतला अष्टमीला बसौडा अष्टमी देखील म्हणतात. या दिवशी बहुतेक लोक देवी शीतलाला शिळा शिरा-पुरीचं नैवेद्य दाखवतात. यावेळी शीतला अष्टमी 4 एप्रिल 2021 ला येत आहे. चला जाणून घेऊ या दिवसाचं महत्त्व  (Sheetala Ashtami 2021 Know The Tithi Vrat Katha And The Importance Of Keeping Fast On This Day)-

देवी शीतलाबाबत मान्यता आहे की त्यांना थंड जेवण अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्यांचं नैवेद्य एक दिवसापूर्वीच म्हणजे सप्तमीलाच तयार केलं जातं आणि थंड नैवेद्या त्यांना दाखवलं जाते. प्रसाद म्हणून भाविकही अष्टमीला शिळ अन्न खातात. ही देखील मान्यता आहे की बसौडा अष्टमीचा दिवस हा शिळ अन्न खाण्याचा शेवटचा दिवस असतो. कारण, या दिवसापासून उन्हाळ्याला सुरुवात होते. त्यानंतर उष्णतेमुळे अन्न अधिक काळापर्यंत चांगलं राहत नाही ते लवकर खराब होतं

उपवास केल्याने कुटुंबाचा या आजारांपासून होतो बचाव

मान्यता आहे की ज्या महिला शीतला अष्टमीच्या दिवशी उपवास ठेवतात, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि लहान मुलांना चिकन पॉक्स, गोवर, कुठलाही गंभीर प्रकारचा ताप, डोळ्यांचे आजार आणि थंडीमुळे होणारे इतर आजार होत नाही. देवी शीतला कुटुंबाचा या आजारांपासून बचाव करते. त्याशिवाय, देवीची विधीवत पूजा केल्याने आणि उपवास ठेवल्याने गरीबी दूर होते.

पूजा विधी

अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करुन देवी शीतलापुढे उपवासाचा संकल्प घ्या. त्यानंतर त्यांनी रोली, अक्षता, जल, पुष्प, वस्त्र, दक्षिणा आणि प्रसाद चढवा. त्यानंतर शीतला स्त्रोताचं पठन करा. व्रत कथा वाचा आणि आरती करा. देवीकडे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा. दिवसभर उपवास ठेवा. सायंकाळी देवीला दाखवलेला प्रसाद खाल्ल्यानंतर उपवास सोडा.

शीतला अष्टमी व्रत कथा –

पौराणिक कथेनुसार, एके दिवशी देवी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघाली. देवीने एका वृद्धेचं रुप धारण केलं आणि राजस्थानच्या डुंगरी गावात त्या पोहोचली. जेव्हा देवी रस्त्याने जात होती तेव्हा तिच्यावर कुणीतरी भाताचं उकळतं पाणी टाकलं. यामुळे देवी भाजली आणि तिच्या शरीरावर व्रण पडले. त्यामुळे होणाऱ्या असह्य जळजळमुळे देवी त्रस्त होती. तिने गावातील लोकांना मदत मागितली. पण तिचं कुणीही ऐकलं नाही. तेव्हा गावातील एका कुंभाराच्या कुटुंबातील महिला देवीजवळ आली आणि देवीला घरी घेऊन गेली (Sheetala Ashtami 2021 Know The Muhurth Vrat Katha And The Importance Of Keeping Fast On This Day).

तिने थंड पाणी देवीवर टाकलं तेव्हा देवीचा त्रास कमी झाला. त्यानंतर कुंभारीन महिलेने रात्रीचा दही आणि ज्वारीची रबडी खायला दिली. यामुळे देवीच्या शरीराला थंडावा मिळाला. त्यानंतर या महिलेने देवीला म्हटलं की तुमच्या विखुरलेल्या केसांना मी वेणी घालून देते. ती देवीच्या केसांची वेणी गुंफू लागली. तेव्हा तिला केसांच्या खाली लपलेला तिसरा डोळा दिसला. हे पाहून महिला घाबरली आणि तेथून पळू लागली. तेव्हा देवी म्हणाली की बेटा घाबरु नकोस मी शीतला देवी आणि पृथ्वीवर हे पाहण्यासाठी आली होती की माझी खरी पूजा कोण करते. त्यानंतर देवीने महिलेला आपलं मूळ स्वरुपाचं दर्शन दिलं.

महिला देवीसमोर रडू लागली आणि म्हणाली की देवी मी अत्यंत गरीब आहे माझ्याकडे तुम्हाला बसवण्यासाठी स्वच्छ जागा देखील नाही. यावर देवी माता हसली आणि तिथे असलेल्या गाढवावर जाऊन विराजमान झाली. त्यानंतर देवीने झाडूने महिलेच्या घराची साफ-सफाई केली आणि घाणीच्या स्वरुपात घरातील दरिद्रतेला एका टोपलीत टाकून बाहेर फेकून दिलं.

त्यानंतर देवीने महिलेला वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा महिला म्हणाली की देवी तुम्ही आमच्या डुमरी गावात निवास करा आणि जी कोणी व्यक्ती तुमची श्रद्धेने अष्टमीची पूजा करेल आणि उपवास ठेवेल आणि तुम्हाला थंड नैवेद्य दाखवेल त्याची गरीबी दूर होईल. त्यानंतर देवीने तिला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत म्हटलं की असंच होईल. तेव्हापासून आजपर्यंत शीतला अष्टमीच्या दिवशी देवीला थंड नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

Sheetala Ashtami 2021 Know The Muhurth Vrat Katha And The Importance Of Keeping Fast On This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन ग्रह राशी बदलणार, ‘या’ राशींना होणार मोठा फायदा…

Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.