Shirdi Sai Baba | साई बाबांच्या पूजेचा महाउपाय, हा उपाय केल्याने दूर होतील सर्व संकटं

'सबका मालिक एक है' चा संदेश देणारे शिर्डीचे साई बाबा त्या सर्व भक्तांची सर्वात मोठी उमेद आहेत ज्यांच्या नशिबाने त्यांची साथ सोडली आहे. बाबांच्या दरबारात कुणी श्रीमंत असो वा गरीब सर्वांच्या प्रार्थना लवकर आणि चमत्कारिकपणे पूर्ण होतात. साई बाबा हे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात. साई बाबांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस आहे.

Shirdi Sai Baba | साई बाबांच्या पूजेचा महाउपाय, हा उपाय केल्याने दूर होतील सर्व संकटं
शिर्डी साई बाबा
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 9:10 AM

मुंबई : ‘सबका मालिक एक है’ चा संदेश देणारे शिर्डीचे साई बाबा त्या सर्व भक्तांची सर्वात मोठी उमेद आहेत ज्यांच्या नशिबाने त्यांची साथ सोडली आहे. बाबांच्या दरबारात कुणी श्रीमंत असो वा गरीब सर्वांच्या प्रार्थना लवकर आणि चमत्कारिकपणे पूर्ण होतात. साई बाबा हे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात. साई बाबांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस आहे. या दिवशी साई बाबाची पूजा आणि उपवास केल्याने बाबांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. साई बाबांच्या उपवासाची संपूर्ण पद्धत जाणून घेऊया –

साई बाबांचे व्रत कसे सुरु करावे

शिर्डीच्या साई बाबांचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरु करु शकता. जे तुम्हाला सलग 9 गुरुवार करावे लागेल. ज्या दिवशी बाबांचा उपवास कराल, त्या दिवशी प्रसादात फक्त फळे खावीत. त्याशिवाय आपण चहा, फळांचा रस इत्यादी घेऊ शकता.

साई बाबा व्रताची पूजा पद्धत

? साई बाबांच्या उपासनेसाठी, गुरुवारी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर, सर्वप्रथम साईनाथचे व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करा.

? यानंतर साई बाबांच्या मूर्तीला किंवा चित्राला स्नान करुन त्यांना वस्त्र, फुले, फळे इत्यादी अर्पण करा.

? यानंतर, साई बाबांच्या चित्र किंवा मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि प्रसादात पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा.

? यानंतर, साई बाबांची कथा वाचा आणि 108 वेळा ‘ॐ साईं देवाय नम:’ या मंत्राचा जप करा. शेवटी बाबांची आरती केल्यानंतर प्रसाद वाटून घ्या आणि स्वतःही घ्या.

? तुम्ही प्रसादात बाबांना पालक किंवा खिचडी देखील अर्पण करु शकता. या दोन्ही गोष्टी बाबांना खूप प्रिय होत्या. जे नंतर एका गरीब व्यक्तीला दान करावे.

साई बाबा व्रताचे उद्यापन कसे करावे?

साई बाबांच्या नवव्या व्रतामध्ये बाबांना सर्व चुकांची क्षमा मागून उद्यापन केले पाहिजे. या दिवशी कमीत कमी पाच गरीब लोकांना खाऊ घाला आणि तुमच्या क्षमतेनुसार दान करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Wednesday Astro Tips | बुधवारी हे उपाय केल्याने बुध दोष होईल दूर, भगवान गणेशही प्रसन्न होतील

Saraswati temple of India | देवी सरस्वतीचे प्रसिद्ध मंदिर, येथे डोकं टेकताच मिळते ज्ञानाचा आशीर्वाद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.