पत्रिका जुळली तरच लग्न करावं का? पाहा प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखादं मुल जन्माला येतं तेव्हा त्याचे आई-वडील त्याची जन्मकुंडली बनवतात. या जन्मकुंडलीवरून त्याचं भविष्य कसं असेल याचा अंदाज येतो.

हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखादं मुल जन्माला येतं तेव्हा त्याचे आई-वडील त्याची जन्मकुंडली बनवतात. या जन्मकुंडलीवरून त्याचं भविष्य कसं असेल याचा अंदाज येतो. याच जन्म कुंडलीवरून पुढे आपल्या मुलांची लग्न देखील जमवली जातात. आपल्या मुलांचं भविष्य कसं असेल? त्याला नोकरीत यश मिळेल की व्यवसायात यश मिळेल? त्याचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याची जन्म पत्रिका बनवली जाते. हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुला-मुलीचं लग्न ठरवलं जातं. त्यापूर्वी दोघांची जन्म पत्रिका जुळवली जाते. जन्म पत्रिका जुळली तरच लग्न ठरवलं जातं.
मुला-मुलीचं लग्न जुळवताना जन्म पत्रिका पाहिली जाते, असं मानलं जातं जर पत्रिका जुळली तर वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानात जातं. पती-पत्नीच्या आयुष्यात समस्या निर्माण होत नाहीत.जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज करता तेव्हा विशेषकरून लग्न पत्रिका जुळवली जाते. तुम्ही जर लव्ह मॅरेज केलं तर शक्यतो जन्म कुंडलीचा प्रश्नच येत नाही. मात्र आता बदलल्या काळानुसार अरेंज मॅरेजमध्ये देखील अनेक ठिकाणी आता मुला-मुलीची पत्रिका न बघता देखील लग्न केली जातात. मात्र लग्न करण्यापूर्वी पत्रिका पाहावी की न पाहावी याबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणतात त्याबद्दल जाणून घेऊयात
प्रेमानंद महाराज यांना एका कार्यक्रमामध्ये एका महिलेनं याबाबत प्रश्न विचारला. महाराज लग्न जुळवताना पत्रिका बघावीच लागते का? महिलेच्या या प्रश्नावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज यांनी हसत म्हटलं की, जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर जन्मकुंडली बघनं आवश्यक आहे. जर तुम्हाला बाबा वगैरे बनायचं असेल तर मग जन्मकुंडली बघण्याची गरज नाही. मात्र आजकाल कोणीच जन्मकुंडली बघत नाही.लव्ह मॅरेजमध्ये तर प्रश्नच नाही. त्याचवेळी एका व्यक्तीने प्रेमानंद महाराज यांना प्रश्न केला की ज्यांचे गुण सर्वाधिक जुळतात त्यांच्यामध्ये देखील भांडण होतात, घटस्फोट होतात. या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की त्यासाठी तुमच्या मनामध्ये संयम आणि सद्गुण अवश्यक आहे. जर या दोन गोष्टी असतील तर तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप कमी होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)