Shravan 2022: आईच्या हत्त्येचे प्रायश्चित्त करण्यासाठी परशुरामाने स्थापित केले होते शिवलिंग, काय आहे पौराणिक कथा

या ठिकाणी परशुरामाने वडील जमदग्नीच्या आज्ञेनुसार आपली आई रेणुकेचा शिरच्छेद केला, असे सांगितले जाते. त्यानंतर प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून शिवाची कठोर तपश्चर्या केली.

Shravan 2022: आईच्या हत्त्येचे प्रायश्चित्त करण्यासाठी परशुरामाने स्थापित केले होते शिवलिंग, काय आहे पौराणिक कथा
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 3:32 PM

सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण सुरू आहे. श्रावण (Shravan 2022) महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र असतो. पण या महिन्यात येणारा सोमवार, प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीला विशेष मान्यता आहे. यादरम्यान शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्याच्या निमित्याने आम्ही तुम्हाला परशुरामेश्वर पुरमहादेव (Parshurameshwar Purmahadev temple)  मंदिराविषयी माहिती देणार आहोत, जे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याजवळ आहे आणि अनेक शिव भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शिवरात्रीला येथे चार दिवसीय यात्रा भरते. त्याला कंवर मेळा म्हणतात. यादरम्यान लाखो कंवरी हरिद्वारहून अनवाणी पायी चालत गंगाजल आणतात आणि महादेवाचा जलाभिषेक करतात. महादेवाच्या भक्तीपुढे या कंवरियांना आपले दुःख दिसत नाही. अनवाणी प्रवास करताना भक्तांना अनेक समस्यांना समोर जावे लागते, पण त्यांच्यासाठी शिवभक्तीपुढे सर्व काही गौण आहे. पूरमहादेवाचे दर्शन घेण्याचा आणि त्यांचा जलाभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे.

परशुरामांनी केली होती या शिवलिंगाची स्थापना

महादेवाचे हे मंदिर बागपत जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या पुरा गावात हिंडन नदीच्या काठावर बांधले आहे. या ठिकाणी जमदग्नी ऋषी आपली पत्नी रेणुका हिच्यासोबत राहत असत. या ठिकाणी परशुरामाने वडील जमदग्नीच्या आज्ञेनुसार आपली आई रेणुकेचा शिरच्छेद केला, असे सांगितले जाते. त्यानंतर प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून शिवाची कठोर तपश्चर्या केली. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन शिवाने त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्या आईला जिवंत केले. तसेच, भगवान शिवाने परशुरामाला कुऱ्हाड दिली, ज्यातून त्याने 21 वेळा क्षत्रियांचा वध केला. पुरा नावाच्या ठिकाणी असल्यामुळे आणि परशुरामाने या शिवलिंगाची स्थापना केल्यामुळे हे मंदिर परशुरामेश्वर पुरा महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.

राणीने मंदिर बांधले होते

कालांतराने त्या जागेचे अवशेष झाले आणि शिवलिंगही कुठेतरी मातीत गाडले गेले. असे म्हणतात की एकदा लांडोराची राणी फिरायला निघाली होती, तेव्हा तिचा हत्ती त्या ठिकाणी थांबला होता. लाख प्रयत्न करूनही हत्ती पुढे सरकायला तयार नव्हता. यावर राणीला खूप आश्चर्य वाटले आणि तिने त्या जागेचे उत्खनन करण्याचा आदेश दिला. ढिगाऱ्याचे उत्खनन करत असताना तेथून हे शिवलिंग सापडले. यानंतर राणीने तेथे भव्य मंदिर बांधले.

हे सुद्धा वाचा

कालपासून सुरू झाला कंवर मेळा

आजही हे मंदिर भाविकांच्या विशेष श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी श्रावण शिवरात्रीला येथे चार दिवसीय कंवर मेळा भरतो. यंदाचा कंवर मेळा सोमवार, 25 जुलैपासून सुरू झाला असून, 28 जुलैपर्यंत चालणार आहे. दरम्यान, याठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी जमते, त्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच बागपतच्या पुरा मंदिरात जत्रा भरवली जात आहे. अशा परिस्थितीत सुमारे 30 लाख भाविक मंदिरात येऊन जलाभिषेक करतील असा अंदाज आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.