Shravan 2022: श्रावण महिन्यात महादेवाला बेलपत्र वाहण्याचे महत्त्व

श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. यासाठी महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा त्यांच्या उपासनेमध्ये समावेश करण्यात येतो. यापैकीच एक म्हणजे बेलपत्र आहे.

Shravan 2022: श्रावण महिन्यात महादेवाला बेलपत्र वाहण्याचे महत्त्व
बेलपत्र वाहण्याचे नियम Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 11:33 AM

सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना (Shravan 2022) सुरू आहे आणि महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी लोकांचा श्रावण महिना 29 तारखेला सुरू होणार आहे. या महिन्यात भक्त भगवान शिवाची (Bhagwan Shiv) आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात. चातुर्मासात भगवान विष्णू सर्व सृष्टीचा भार महादेवावर सोपवून ते योगनिद्रेत जातात. त्यामुळे महादेवाच्या भक्ती आणि उपासनेला विशेष महत्त्व असते. श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. यासाठी महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा त्यांच्या उपासनेमध्ये समावेश करण्यात येतो. यापैकीच एक म्हणजे बेलपत्र आहे. महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. जे अर्पण केल्याने भगवान  शंकर आपल्या भक्तांवर आवली कृपा दृष्टी ठेवतात. मात्र, बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत. ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. बेलची पाने तोडण्याचे तसेच अर्पण करण्याचे नियम आणि महत्त्व जाणून घेऊया.

या दिवशी तोडू नये बेलची पाने

हे सुद्धा वाचा

चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलची पाने तोडू नयेत. तसेच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी बेलची पाने तोडू नयेत. यासाठी डहाळीसह बेलपत्रही तोडू नये. डहाळीहून निवडून केवळ बेलपत्र तोडले पाहिजे, कधीही पूर्ण डगाळ तोडू नये. पत्री तोडताना झाडाला हानी होता कामा नये. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावे. महादेवाला बेलपत्र नेहमी उलटं अर्पित करावं अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा. बेलपत्रात चक्र आणि वज्र नसावे.  बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात. जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानले जाते. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही

बेलाची पाने अर्पण करण्याचे नियम

अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने महादेवाला बेलची पाने नेहमी अर्पण करा. भगवान शंकराला बिल्वाची पाने अर्पण करण्याबरोबरच जलाभिषेक करणे आवश्यक आहे. ज्योतिषाच्या मते बेलची पाने कधीच शिळी होत नाहीत. नवीन बेलची पाने उपलब्ध नसल्यास अर्पण केलेली बेलची पाने धुऊन पुन्हा पूजेत वापरता येतील.

बेलपत्राचे महत्त्व

शिवपुराणानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादानाचे फळ मिळते. शिवलिंगावर बेलची पाने अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते. बेलपत्राने फक्त शिवच नाही तर बजरंगबलीसुद्धा प्रसन्न होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.