Shravan Shivratri 2022: कधी आहे श्रावणातील शिवरात्र; जाणून घ्या, तिथी, महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत!

Shravan Shivratri 2022: हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला, श्रावणातील शिवरात्री साजरी केली जाते. जाणून घ्या, या वेळी श्रावण शिवरात्री कधी येते, पुजेची तिथी आणि या व्रताचे महत्व.

Shravan Shivratri 2022: कधी आहे श्रावणातील शिवरात्र; जाणून घ्या, तिथी, महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत!
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 2:25 PM

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित (Dedicated to Shankara) आहे आणि या महिन्यात शिवपूजा विशेष फळ देणारी मानली जाते. संपूर्ण श्रावण मासामध्ये अनेक प्रकारचे उपवास आणि सण (Fasting and festivals) येतात. त्यापैकी श्रावण शिवरात्रीचे विशीष्ट महत्त्व असते. या उत्सवात एकीकडे मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते, तर दुसरीकडे लोक शंकराची पूजा आणि जलाभिषेकही पूर्ण भक्तिभावाने करतात. शिवपूजेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून, या महिन्यात दर सोमवारी उपवास ठेवला जातो. भगवान शंकराची पूजा विधीपूर्वक केली जाते. कावड यात्रेच्या (Kavad Yatra) माध्यमातून भाविक भगवान शंकराची पूजा करतात. असे मानले जाते की, या विशेष उत्सवात भगवान शंकराची विशेष पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी शिवरात्री म्हणून साजरी केली जाते. जाणून घेऊया, यंदा श्रावण शिवरात्री कधी येते आणि पुजेची तिथी केव्हा आहे.

श्रावण शिवरात्रीची तिथी

या वर्षी श्रावण शिवरात्री 26 जुलै 2022, मंगळवारी साजरी केली जाईल. चतुर्दशी तिथी 26 जुलै 2022, मंगळवारी संध्याकाळी 06:46 पासून सुरू होईल. चतुर्दशी तिथीची समाप्ती – 27 जुलै 2022, बुधवारी रात्री 09:11 मिनिटांनी होईल.

श्रावण शिवरात्रीचे महत्व

श्रावणाच्या शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते. या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण केले जाते. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशी मान्यता आहे. भगवान शिव भक्तांचे सर्व संकट दूर करतात. भगवान शिव सौभाग्य, सुख, शांती आणि आरोग्य देवो. असे मानले जाते की, या दिवशी व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. शिवलिंगावर बेलची पाने अर्पण केल्याने अविवाहित मुलींना इच्छित वर प्राप्त होते.

या पद्धतीने करा पूजा

श्रावण शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. अंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. भगवान शिवाचे ध्यान करा. दिवसभर उपवास करा. या दिवशी तुम्ही पूजेसाठी मंदिरात जाऊ शकता किंवा घरी पूजा करू शकता. या दिवशी शिवलिंगाचा रुद्राभिषेक करावा. भगवान शंकराला दूध, तूप, गंगाजल, मध, साखर आणि उसाच्या रसाने रुद्राभिषेक करावा. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन, फळे, बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करा. धूप आणि दिवे लावा. श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिव चालीसा, शिव स्तुती, शिवाष्टक आणि शिव पंचाक्षर स्तोत्र मंत्राचा जप करावा. यानंतर शिवरात्रीची कथा ऐका आणि भगवान शंकराची आरती करा. प्रसाद अर्पण करून सर्वांना वाटावा. या पद्धतीने पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.