श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्याचे काही खास नियम जाणून घ्या

यावर्षी हा पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. या महिन्यात भगवान शंकराला पाणी आणि दुधाचा अभिषेक केला जातो. यासह, बेलची पाने देखील अर्पण केली जातात. श्रावण महिन्यात बेलपात्राला खूप महत्त्व आहे

श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्याचे काही खास नियम जाणून घ्या
Belpatra Niyam
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 9:01 AM

मुंबई : श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. यावर्षी हा पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरु होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. या महिन्यात भगवान शंकराला पाणी आणि दुधाचा अभिषेक केला जातो. यासह, बेलची पाने देखील अर्पण केली जातात. श्रावण महिन्यात बेलपात्राला खूप महत्त्व आहे (Shrawan 2021 Bel Patra Niyam Know These Rules Before Offering Bel Patra To Mahadev).

पौराणिक कथेनुसार, एकदा देवी पार्वतीने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि त्याचे काही थेंब मंदार पर्वतावर पडली, ज्यातून बेलाच्या झाडाचा उगम झाला. या झाडाच्या मुळांमध्ये गिरीजा, देठामध्ये महेश्वरी, शाखांमध्ये दक्षयायनी, पानांमध्ये पार्वती, फुलांमध्ये गौरीचा निवास असतो अशी मान्यता आहे. हेच कारण आहे की भगवान शिवला बेलपात्र अतिप्रिय आहे. अशा परिस्थितीत, भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे.

शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा –

? शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना त्याची दिशा लक्षात ठेवा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना शिवलिंगावर पानाचा गुळगुळीत पृष्ठभाग अर्पण करा.

? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करताना नेहमी अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने अर्पण करा. शिवजीवर बेलपत्र अर्पण करण्याबरोबरच पाणीही नक्की अर्पण करा.

? बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की त्याची पाने कुठूनही फाटलेली नसावित.

? बेलपत्राला अपवित्र मानले जात नाही. आपण आधीच अर्पण केलेले बेलपात्र पुन्हा धुवून अर्पण करु शकता.

? बेल पत्र सोमवारी तोडू नये. अशा स्थितीत पूजेच्या एक दिवस आधी बेलपत्र तोडून ठेवली जातात.

Shrawan 2021 Bel Patra Niyam Know These Rules Before Offering Bel Patra To Mahadev

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Nag Panchami 2021 : कधी आहे नागपंचमी? जाणून घ्या शुभ वेळ, पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व

दर 12 वर्षांनी घडतो अद्भुत चमत्कार, आकाशातून वीज कोसळून शिवलिंग भंग पावते आणि पुन्हा जोडलेही जाते

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.