Shrawan 2022: आजपासून सुरू होतोय श्रावण मास, 7 विशेष योग आणि 6 महत्त्वाचे सण, प्रत्येक सोमवार असेल खास

श्रावण महिना (Shrawan 2022) 14 जुलै म्हणजेच आजपासून सुरू होत आहे, आणि 12 ऑगस्टपर्यंत चालेल. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र  वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउससुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरणसुध्दा छान असते. […]

Shrawan 2022: आजपासून सुरू होतोय श्रावण मास, 7 विशेष योग आणि 6 महत्त्वाचे सण, प्रत्येक सोमवार असेल खास
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 1:26 PM

श्रावण महिना (Shrawan 2022) 14 जुलै म्हणजेच आजपासून सुरू होत आहे, आणि 12 ऑगस्टपर्यंत चालेल. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र  वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउससुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरणसुध्दा छान असते. शिवभक्तांसाठी हा महिना खूप खास आहे. श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकराची विधिवत पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात शिव पृथ्वीवरच वास्तव्य करतात.  यावेळी श्रावण महिन्यात चार सोमवार (Frist shrawan somwar) असतील. श्रावणातील  सोमवारच्या व्रताचे (vrat) विशेष महत्त्व सांगितले आहे. श्रवणामध्ये तीन वेळा रवि योग येणार असून उर्वरित चार योग वेगवेगळ्या दिवशी पडत असल्याचे ज्योतिषी सांगतात.

श्रवणामध्ये सात विशेष योग

सावनमध्ये तीन वेळा रवि योग येणार असून उर्वरित चार योग वेगवेगळ्या दिवशी पडत असल्याचे ज्योतिषी सांगतात. 18 जुलै रोजी पहिला सोमवार असून या दिवशी शोभन आणि रवि योग असतील.

25 जुलै रोजी श्रावणाचा दुसरा सोमवार असून या दिवशी प्रदोष व्रतासह सर्वार्थ सिद्धी योग असेल. 1 ऑगस्टला श्रावणाचा तिसरा सोमवार असून या दिवशी प्रजापती आणि रवि योग तयार होणार आहेत. त्याचवेळी पुत्रदा एकादशी 8 ऑगस्टला म्हणजेच चौथ्या सोमवारी असेल. श्रावणातील हे सर्व शुभ काळ भगवान शंकराच्या पूजेसाठी अतिशय शुभ आहेत.

हे सुद्धा वाचा

याशिवाय शुक्रवार, 14 जुलैपासून श्रावण सुरू होत असून या दिवशी दोन विशेष योगही असतील. ज्योतिषी सांगतात की श्रावण महिन्याची सुरुवात विस्कुंभ आणि प्रीति योगाने होत आहे, त्यामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे. या दोन्ही विशेष मुहूर्तांमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याचे इच्छित फलप्राप्ती होते. या शुभकाळात पूजेदरम्यान शिवलिंगाची गंगाजलाने पूजा करून बेलपत्र अर्पण करावे.

श्रवणामध्ये 6 महत्त्वाचे सण

  1. सोमवार, 24 जुलै – कामिका एकादशी
  2. मंगळवार, 26 जुलै – मासिक शिवरात्री
  3. गुरुवार, 28 जुलै – हरियाली अमावस्या
  4. रविवार, 31 जुलै – हरियाली तीज
  5. मंगळवार, 2 ऑगस्ट – नागपंचमी
  6. गुरुवार, 12 ऑगस्ट – रक्षाबंधन

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.