Shrawan Somwar : श्रावण महिन्यात अवश्य करा हे प्रभावी उपाय, महादेवाच्या कृपेने होतील सर्व मनोकामना पूर्ण
यंदा अधीक मासमुळे श्रावण महिना दोन महिन्यांचा असणार आहे. या काळात केलेल्या काही विशेष उपायांमुळे भगवान शिवासह शनिदेवाचीही कृपा लाभेल.

मुंबई : 18 जुलैपासून श्रावण महिन्याला (Shrawan 2023) सूरूवात होत आहे. भगवान शिवाच्या उपासनेसाठी हा महिना अत्यंत शुभ आणि फलदायी मानल्या जातो. यंदा अधीक मासामुळे श्रावण महिना दोन महिने चालणार आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना आणि अभिषेक केल्याने सर्व संकटे दूर होतात. या महिन्यात भावीक भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. रुद्राभिषेक करण्याबरोबरच बेलपत्र, धतुरा, शमीची पाने, आकृतीची फुले, पंचामृत इत्यादी अनेक वस्तू अर्पण करून अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात दिव्याशी संबंधित उपाय केल्यास ते खूप फायदेशीर मानले जाते.
शनिदेवाचीही कृपा होईल प्राप्त
भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासोबतच शमीची पानेही अर्पण केली जातात. यामुळे भगवान शिव आणि शनि या दोघांचाही आशीर्वाद मिळतो. जर तुम्हीही शमीच्या रोपाजवळ रोज दिवा लावलात तर तुम्हाला अनेक फायदे होतील.
योग्य दिशा
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शमीचे रोप लावणे देखील खूप शुभ मानले जाते. शमीची वनस्पती शनिदेवाला प्रिय आहे. शमीचे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास सुख-समृद्धीसोबतच धनप्राप्तीही होते. शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनीचे दोष दूर होतात.




दिवा लावा
घरामध्ये शमीचे रोप असेल तर त्याजवळ रोज दिवा लावावा. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच घरात समृद्धी राहते. शमीचे रोप घराच्या दक्षिण दिशेला ठेवावे. रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ मातीचा किंवा पिठाचा दिवा लावा. दिवा लावताना मनातल्या मनात भगवान शिवाची प्रार्थना करा.
शिवपूजा
श्रावण महिन्यात शमीच्या झाडाजवळ दिवा लावून शनिदेव प्रसन्न होतात. यासोबतच भगवान भोलेनाथांचा आशीर्वादही प्राप्त होतो. सावन महिन्यात दररोज शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करा. दुसरीकडे, अशुभ आणि नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शमीची पाने शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने सौभाग्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)