AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan somwar 2022: कधीपासून सुरू होत आहेत श्रावण सोमवार?; श्रावणाचे महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या वर्षी श्रावण मास किंवा श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू होत आहे (Shrawan somwar 2022) आणि श्रावणाचा  शेवटचा दिवस 27 ऑगस्ट रोजी येईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा […]

Shrawan somwar 2022: कधीपासून सुरू होत आहेत श्रावण सोमवार?; श्रावणाचे महत्त्व
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:29 PM

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या वर्षी श्रावण मास किंवा श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू होत आहे (Shrawan somwar 2022) आणि श्रावणाचा  शेवटचा दिवस 27 ऑगस्ट रोजी येईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना असतो. यंदा श्रावण, विषकुंभ आणि प्रीति योगात होत आहे.

  1. यंदा पहिला श्रावण सोमवार (First shravan somwar 2022) हा 1 ऑगस्ट रोजी येणार आहे. या दिवशीचे शिवपूजन शिवामूठ तांदूळ आहे. याशिवाय याच दिवशी विनायक चतुर्थी असल्याने अत्यंत शुभ दिवस आहे.
  2. दुसरा श्रावण सोमवार 8 ऑगस्टला येणार आहे. यादिवशीशी शिवपूजन शिवमूठ तीळ आहे. यादिवशी पुत्रदा एकादशीसुद्धा आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. तिसरा श्रावण सोमवार 15 ऑगस्टला येणार आहे. या दिवशीची शिवपूजन शिवमूठ मूग आहे. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनसुद्धा आहे.
  5.  चौथा श्रावण सोमवार 22 ऑगस्टला येतोय. या सोमवारची शिवपूजन शिवमूठ जव आहे. या दिवशी एकादशीसुद्धा आहे.

श्रावण महिन्याचे महत्त्व

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे या महिन्या मध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदीत करतात तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. तसेच हा महिना अत्यंय हर्षोउल्हासात जातात.वण मासामध्ये निसर्ग देखील बहरून निघतो व या महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर, पोळा असे अनेक सण येतात. अनेक महिला या महिन्यात देव- देवतांची उपासना करतात. असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद, उत्साह पसरवतो. प्रत्येकास नवचैतन्य देतो, सर्वाना तो हवाहवासा वाटतो. शिवामुठच्या व्रताने दर सोमवारी तांदुळ, तीळ, मुग, जवस आणि सातु अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. त्यानंतर श्रावणातील शुक्ल पक्षात येणार्‍या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा‘ (Narali pornima 2022) म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणा-या कोळी बांधवासाठी हा खास सण ज्याच्यावर संपूर्ण कुंटूबाचे जीवन अवलंबून असते अशा या समुद्राला यादिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.