Janmashtami 2021 : हजार एकादशी समान आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत, जागरण, भजन केल्याने मिळतात अनंत लाभ
श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीकृष्ण श्री विष्णूचा आठवा अवतार होते. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी तिथी कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते.
मुंबई : श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीकृष्ण श्री विष्णूचा आठवा अवतार होते. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी तिथी कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी, लोक भगवान श्रीकृष्णासाठी उपवास ठेवतात आणि त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच मध्यरात्री 12 वाजता त्यांची पूजा करतात. सुका मेवा, मिठाई आणि 56 प्रकारचे भोग अर्पण करतात आणि पूजेनंतर उपवास सोडतात.
यावेळी जन्माष्टमीचा हा सण सोमवार 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्रत केल्याने 100 पापांपासून मुक्ती मिळते. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने या व्रताचा महिमा जाणून घ्या.
हजार एकादशी समान
शास्त्रांमध्ये एकादशीचे व्रत हे मोक्षदायी आणि सर्वोत्तम व्रतांमधून एक मानले गेले आहे. पण त्याचे नियम खूप कठीण आहेत, त्यामुळे प्रत्येकाला एकादशीचे व्रत ठेवणे शक्य नाही. अशा स्थितीत, जन्माष्टमीच्या व्रताने तुम्ही एकादशीसारखे पुण्य मिळवू शकता. शास्त्रांमध्ये या जन्माष्टमीचे व्रत एक हजार एकादशीच्या व्रताच्या बरोबरीचे मानले गेले आहे.
जप केल्याने अनंत लाभ मिळतो
जन्माष्टमीच्या दिवशी ध्यान, जप आणि रात्री जागरण करणे याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. असा विश्वास आहे की या दिवशी जप आणि ध्यान केल्याने अनंतपट परिणाम मिळतात. म्हणून जन्माष्टमीच्या रात्री जागरण करुन देवाचे भजन गावे.
अकाली मृत्यूपासून संरक्षण
भविष्यपुराणानुसार जन्माष्टमीचे व्रत अकाली मृत्यूपासून संरक्षण देणारे मानले जाते. असेही म्हटले जाते की जर गर्भवती महिलेने हे व्रत केले तर तिचे मूल गर्भात पूर्णपणे सुरक्षित राहाते. त्याला श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
जन्माष्टमीच्या व्रताच्या दिवशी हा उपवास पूर्ण भक्तीने ठेवा कारण देव फक्त प्रेमाचा भुकेला असतो. त्यांना तुम्ही श्रद्धेने जे काही अर्पण केले, ते नक्कीच स्वीकारतात. याशिवाय, व्रताच्या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करा. शक्य असल्यास गीता वाचा किंवा ऐका. पूजेदरम्यान, श्री कृष्णाला पंचामृत आणि तुळशीची पाने अर्पण करा. कुणाचीही निंदा करु नका किंवा खोटे बोलू नका किंवा कोणालाही त्रास देऊ नका.
Krishna janmashtami 2021 : कान्हाच्या मुरलीमध्ये दडली आहेत अनेक रहस्ये, जाणून घ्या भगवान श्रीकृष्णाशी संबंधित गोष्टींचे धार्मिक महत्त्वhttps://t.co/EGo55l2CWr#LordKrishna |#Murali |#Peacockpiece |#Secret
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 23, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shiva Puja Benefits | सोमवारच्या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा करा, आयुष्यात चमत्कारिक बदल जाणवतील