Shri Ram : या कारणामुळे भगवान विष्णूंनी घेतला होता रामाचा अवतार, अशी आहे पौराणिक कथा

तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली. वैकुंठाहून परत येत असताना नारदमुनींनी एका सुंदर नगरीच्या भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी पाहिली आणि तिच्यावर मोहित झाले. राजकन्येशी लग्न करण्याच्या इच्छेने, ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली...

Shri Ram : या कारणामुळे भगवान विष्णूंनी घेतला होता रामाचा अवतार, अशी आहे पौराणिक कथा
श्री रामImage Credit source: social Media
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 4:52 PM

मुंबई : अयोध्येतील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठापणेबाबत राम भक्तांमध्ये जल्लोष आणि उत्साह आहे. अयोध्येतील रामललाच्या अभिषेक सोहळा पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. अवघा देश राममय झाला आहे. श्री राम (Shri Ram)  हा भगवान विष्णूचा सातवा अवतार मानला जातो. या बाबतची एक पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत. भगवान विष्णूचा जन्म पृथ्वीवर श्री राम म्हणून का झाला यामागची आख्यायीका आपण जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार, एकदा सनकादिक मुनी भगवान विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने वैकुंठाला आले. तेव्हा दोन द्वारपालांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवून त्याची थट्टा सुरू केली. तेव्हा सनकादिक मुनींनी क्रोधित होऊन दोघांनाही तीन जन्मासाठी राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. जय विजय, जेव्हा दोघांनी वारंवार माफी मागितली तेव्हा ऋषी म्हणाले की भगवान विष्णू तुला तिन्ही जन्मात मारतील. त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल.

या दोन द्वारपालांनी हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष म्हणून पहिला जन्म घेतला. त्यानंतर भगवान विष्णूने वराह अवतारात प्रकट होऊन दोघांचा वध केला. त्यांनी रावण आणि कुंभकर्ण म्हणून दुसरा जन्म घेतला. तेव्हा भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेऊन त्यांचा अंत केला. तिसर्‍या जन्मात या दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून झाला, त्यानंतर भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला. यानंतर दोघांनाही मोक्ष प्राप्त झाला अशी आख्यायीका प्रचलित आहे.

नारद मुनींचा भगवान विष्णूला शाप?

धार्मिक कथांनुसार, एकदा नारदमुनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे गर्विष्ठ झाले. तेव्हा अहंकाराने त्रस्त झालेले नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवल्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले.

हे सुद्धा वाचा

तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली. वैकुंठाहून परत येत असताना नारदमुनींनी एका सुंदर नगरीच्या भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी पाहिली आणि तिच्यावर मोहित झाले. राजकन्येशी लग्न करण्याच्या इच्छेने, ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल.

असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरांसारखे केले. नारद मुनी, स्वतःच्या रूपाबद्दल अनभिज्ञ, तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्येच्या महालात पोहोचले, जिथे इतर राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते. नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले आणि राजकन्येनेही नारदमुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घातली.

तेव्हा नारद मुनींनी पाण्यामध्ये त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांचा वानरसारखा चेहरा पाहून भगवान विष्णूंचा खूप राग आला. त्यानंतर ते वैकुंठाला पोहोचले, जिथे तीच राजकुमारी भगवान विष्णूंसोबत बसली होती. तेव्हा नारद मुनींनी क्रोधित होऊन भगवान विष्णूला शाप दिला की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली, म्हणून तुम्हाला शाप देतो की तूम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तुम्हाला वानरांची मदत घ्यावी लागेल. असे मानले जाते की नारद मुनींच्या शापामुळे भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात मानव जन्म घेतला. अशा अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?.
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्...
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्....
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा.
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?.
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका.
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....