Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaadi Muhurat 2021 : लग्न, गृहप्रवेश, घर-गाडी खरेदीची योजना आखताय? जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरचे शुभ मुहुर्त

विवाहांचा शुभ मुहुर्त (Wedding Shubh Muhurat) सुरु झाले आहेत. देवउठनी एकादशीला तुळशी विवाह झाल्यामुळे विवाह, उद्घाटन, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये सुरु होतात. पूर्वी चातुर्मासात ही सर्व शुभ कार्ये वर्ज्य होती. चातुर्मासात भगवान विष्णू चार महिन्यात निद्रावस्थेत राहतात, त्यामुळे सर्व शुभ कार्ये बंद राहतात.

Shaadi Muhurat 2021 : लग्न, गृहप्रवेश, घर-गाडी खरेदीची योजना आखताय? जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरचे शुभ मुहुर्त
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 6:30 AM

मुंबई : Shubh Muhurat 2021 : विवाहांचा शुभ मुहुर्त (Wedding Shubh Muhurat) सुरु झाले आहेत. देवउठनी एकादशीला तुळशी विवाह झाल्यामुळे विवाह, उद्घाटन, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्ये सुरु होतात. पूर्वी चातुर्मासात ही सर्व शुभ कार्ये वर्ज्य होती. चातुर्मासात भगवान विष्णू चार महिन्यात निद्रावस्थेत राहतात, त्यामुळे सर्व शुभ कार्ये बंद राहतात. 14 नोव्हेंबर 2021 पासून शुभ मुहुर्ताला सुरुवात झाली आहे. 2021 च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लग्न, गृहप्रवेश इत्यादीसाठी किती आणि कोणते शुभ मुहूर्त असतील ते जाणून घेऊया –

नोव्हेंबर 2021 आणि डिसेंबर 2021 चे शुभ मुहुर्त

नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नासाठी शुभ मुहुर्त (Wedding Dates in November 2021) :

वैदिक पंचागानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नासाठी 5 दिवस शुभ आहेत. यामध्ये 20 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर हे प्रमुख आहेत.

डिसेंबर 2021 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त (Wedding Dates in December 2021) :

डिसेंबरमध्ये लग्नासाठी 6 शुभ मुहुर्त आहेत. यामध्ये 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर हे लग्नासाठी अतिशय शुभ आहेत.

नोव्हेंबर 2021 मध्ये गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त (Griha Pravesh Muhurat in 2021) :

पंचांगानुसार, नोव्हेंबरच्या उरलेल्या दिवसांत गृहप्रवेशासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. ज्यामध्ये एक 20 नोव्हेंबर तर दुसरी 29 नोव्हेंबरला आहे. तर केवळ 13 डिसेंबर, सोमवार हा डिसेंबरमध्ये गृहप्रवेशासाठी शुभ दिवस आहे.

घर किंवा जमीन खरेदीसाठी शुभ मुहुर्त (Property Purchase Muhurat in 2021) :

नोव्हेंबरमध्ये घर किंवा जमीन खरेदीसाठी 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर हे दोन दिवस शुभ आहेत. त्याचवेळी डिसेंबरमध्ये घर आणि जमीन खरेदीसाठी 7 शुभ दिवस आहेत. हे 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 10 डिसेंबर, 23 डिसेंबर, 24 डिसेंबर, 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर आहेत.

वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त (Vehicle Buying Shubh Muhurat in 2021) :

नोव्हेंबर 2021 मध्ये नवीन कार खरेदी करण्यासाठी 4 दिवस शुभ आहेत. हे 21 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर आहेत.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 5 गोष्टी नक्की करा, आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील

Best Astro Remedies | ज्योतिषशास्त्रातील काही सोपे आणि प्रभावी उपाय करा, सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल

धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.