Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय, कधीच भासणार नाही पैशांची तंगी

दीर्घ काळापासून आर्थिक तंगीचा सामना करीत असाल तर शुक्रवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा. यामुळे धनहानी टळते.

Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय, कधीच भासणार नाही पैशांची तंगी
लक्ष्मी पूजन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:31 PM

मुंबई,  श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, परंतु कष्ट केल्याशिवाय पैसा मिळवणे कठीण आहे. मात्र, काही लोकांना कष्ट करूनही अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत काही ज्योतिषीय उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. विशेषत: शुक्रवारी जर तुम्ही काही उपायांचा अवलंब केलात तर तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी, पैसे वाचवण्याच्या संधी आणि हरवलेले किंवा रखडलेले पैसे मिळण्यास मदत होते.  वास्तविक शुक्रवारचा (Shukrawar Upay) स्वामी शुक्र आहे. शुक्र देव संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य दर्शवतात. शास्त्रात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीचा दिवस म्हणून सांगण्यात आला आहे. देवी लक्ष्मी देखील संपत्तीची देवी आहे. जाणून घेऊया शुक्रवाच्या काही उपायांबद्दल.

  1. शुक्रवारी अष्ट लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा करा. ही पूजा रात्री करा. ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता.
  2. यासोबतच लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्राचीही पूजा करावी. श्रीयंत्राची पूजा करण्याबरोबरच त्यात बनवलेल्या प्रत्येक कोनाकडे पहा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटे टळतात.
  3. हे सुद्धा वाचा
  4. अष्ट लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अर्पण करा, असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
  5. जर तुमचे पैसे चोरीला गेले असेल किंवा कुठेतरी अडकले असेल तर तुम्ही शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर, गूळ, मैदा किंवा इतर कोणतीही पांढरी गोड वस्तू खाऊ घालावी.
  6.  घरात काळ्या मुंग्या येणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे. म्हणूनच त्यांना अन्न मिळाले पाहिजे तसेच त्यांना मारण्याची चूक करू नये.
  7. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीला गूळ आणि फुटण्याचा नैवेद्य दाखवावा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.