तुम्हालाही पितृ दोष आहे? हे तीन साधे उपाय करा अन् मिळवा मुक्ती
हिंदू धर्माशास्त्रानुसार पितृ दोष हा फक्त त्या व्यक्तीपुरताच मर्यादीत राहात नाही तर त्याच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना देखील पितृ दोषाचे परिणाम भोगावे लागतात.
हिंदू धर्माशास्त्रानुसार पितृ दोष हा फक्त त्या व्यक्तीपुरताच मर्यादीत राहात नाही तर त्याच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना देखील पितृ दोषाचे परिणाम भोगावे लागतात. जर तुमच्या पाठीशी पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला तुमच्या आयु्ष्यात कोणतंही संकट येत नाही, तुमच्या आयुष्यात सुख सुमृद्धी राहाते, पैशांची देखील कधीच कमतरता जाणवत नाही. मात्र याच्या उलट जर तुमचे पूर्वज हे तुमच्यावर नाराज असतील तर तुमच्या आयुष्यात अनेक संकट येऊ शकतात. यालाच धर्म शास्त्रांमध्ये पितृ दोष असे म्हणतात. आज आपण पितृ दोष दूर करण्यासाठीचे काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत.
पितृ दोष दूर करण्यासाठी काय करावं
पितृ दोष दूर करण्यासाठी तर्पण विधी सांगीतला आहे.सर्वपित्री आमावस्येला किंवा पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून तुमच्या पित्रांना तर्पण देऊ शकता. असं मानलं जातं की काळे तीळ हे यमराजांना खूप प्रिय असतात. त्यामुळे पितृ दोष दूर होण्यास मदत होते.
जर तुम्हालाही पितृ दोष असेल तर पितृ पंधरवाड्यामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीला उपवास करावा. या दिवशी भगवान विष्णूंना काळे तीळ अपर्ण करा यामुळे देखील पितृ दोष दूर होण्यास मदत होते.
पितृ पंधरवाड्यामध्ये पूजा करताना काळ्या तिळांचा उपयोग करावा, काळे तीळ हे राहू,केतू आणि शनी या ग्रहांना शांत करतात. त्यामुळे या ग्रहांकडून तुम्हाला शुभ फळ मिळतं.
पितृ दोष कसा ओळखावा?
जर तुमच्या घरात सातत्यानं भांडणे होत असतील वाद विवाद होत असतील, त्यानंतर जर एखाद्या दाम्पत्याला संतान प्राप्तीसाठी अडचण येत असेल. अचानक काही संकटे येत असतील, काही आजार असतील तर त्या कुटुंबाला पितृ दोष असू शकतो असं मानलं जातं. हे दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये विविध उपाय सांगितले आहेत.
डिस्क्लेमर : (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)