Som Pradosh Vrat 2021 : सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्व

आज ज्येष्ठ महिन्याचा पहिला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat 2021) आहे. या दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

Som Pradosh Vrat 2021 : सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचं महत्त्व
मंगळागौरी व्रतामागे आहे ही कथा
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 7:35 AM

मुंबई : आज ज्येष्ठ महिन्याचा पहिला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat 2021) आहे. या दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला दोन्ही पक्षात हा व्रत ठेवला जातो. प्रत्येक प्रदोषचा अर्थ त्याच्या दिवसानुसार भिन्न असतो (Som Pradosh Vrat 2021 Know The Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of Mahadev Puja).

यावेळी प्रदोष व्रत सोमवारी पडत आहेत, म्हणून त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष व्रत एकादशी प्रमाणे प्रत्येक महिन्यात दोनदा येतो. एका वर्षात 24 प्रदोष व्रत असतात. सोमवारचा दिवस हा भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा केल्यास विशेष परिणाम मिळतात. या दिवसाशी संबंधित महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

शुभ मुहूर्त –

? सोम प्रदोष व्रताची सुरुवात – 07 जून रोजी सकाळी 8 वाजून 47 मिनिटांपर्यंत

? सोम प्रदोष व्रत समाप्त – 08 जून रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी

? पूजेचा शुभ मुहूर्त – 07 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिटांपासून ते संध्याकाळी 9 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल.

सोम प्रदोष व्रताचे महत्त्व

सोम प्रदोष व्रताची उपासना केल्याने एखाद्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राचा वाईट प्रभाव असेल, त्यांनी भक्ती आणि नियमांनी उपवास ठेवावा. याशिवाय हा उपवास संतान होण्यासाठीही खूप महत्वाचा आहे.

पूजा कशी करावी?

सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर व्रताचा संकल्प करावा. यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वती यांची विधीवत पूजा करावी. विवाहित महिलांना पार्वती देवीला श्रृंगारच्या वस्तू द्याव्या. या दिवशी फक्त फळांचे सेवन करावे, संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करावी.

सोम प्रदोषच्या दिवशी व्रताचे पूजन केल्याने आर्थिक समस्या दूर होते. शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जावे पाहुयात –

? सोम प्रदोष व्रताच्या दिवशी उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुधामध्ये गूळ मिसळून भगवान महादेवाचा अभिषेक करावा. यामुळे घरात संपत्ती वाढण्याची शक्यता निर्माण होते.

? सोम प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी उपवास ठेवल्यास एखाद्याला अशुभ परिणामांपासून मुक्तता मिळते. जर एखादी व्यक्ती मुंगा धारण करायचा विचार करत असेल तर हा सर्वोत्तम दिवस आहे.

? आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्रांचा जप केल्याने सर्व समस्या दूर होतील. असे केल्याने तुम्ही निरोगी व्हाल.

? सोम प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा. याशिवाय, या दिवशी शिव महिम्नस्तोत्राचा जप केल्याने शुभ परिणाम मिळतात.

Som Pradosh Vrat 2021 Know The Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of Mahadev Puja

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Som Pradosh Vrat 2021 | आज सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रत आणि महादेवाच्या पूजेचं महत्व

Apara Ekadashi 2021 : धन आणि पुण्य देणारी अपरा एकादशी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.