Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्या, जाणून घ्या वडाच्या झाडाच्या पूजेचं महत्व

वटपौर्णिमेलाच नाही तर, इतर कोणत्याही अमावस्येला वटवृक्षाची पूजा करणं पुण्यप्राप्त करण्यासारखंच असतं. यावर्षी वटपौर्णिमेला सोमवती अमवस्येचा योग आला आहे. त्याने वडाच्या झाडाच्या पूजेचे महत्व खूप जास्त वाढते.

Somvati Amavasya 2022:  सोमवती अमावस्या, जाणून घ्या वडाच्या झाडाच्या पूजेचं महत्व
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:57 AM

हिंदू (Hindu) पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारा पौर्णिमा (Pournima) हा दिवस “वटपौर्णिमा” (Vatpournima) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.महिला वट सावित्रीचं व्रत करतात. हे व्रत करण्याचं महात्म्य पुराणात देखील सांगितले आहे. पण, फक्त वटपौर्णिमेलाच नाही तर, इतर कोणत्याही अमावस्येला वटवृक्षाची पूजा करणं पुण्यप्राप्त करण्यासारखंच असतं. यावर्षी सोमवती अमवस्येचा योग मे महिन्यातील 30 तारखेला आला आहे. त्याने वडाच्या झाडाच्या पूजेचे महत्व खूप जास्त वाढते.

ज्येष्ठ मास मधील कृष्ण पक्षातील अमावस्येला वट सावित्री व्रत (Vat savitri Vrat 2022) केलं जातं. यंदा वटपौर्णिमा जून महिन्यातील 14 तारखेला मंगळवारी आली आहे.  ज्येष्ठ महिन्यात येणारी सोमवती अमावस्या विशेष मानली जाते. सोमवती अमावस्येचे व्रत आणि पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी खास विवाहीत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. भगवान शिव-पार्वतीचीही पूजा केली जाते.मे महिन्यात येणारी अमावस्या ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. यावर्षी मंगळवारी, 30 मे 2022 रोजी सोमवती अमावस्या व्रत पाळण्यात येणार आहे. सोमवती अमावस्येला शास्त्रात खूप महत्व आहे. यंदा हे दोन्ही योग एकाच दिवशी आले आहेत. तर यादिवशी वटवृक्षाची पूजा करून काय फायदे लाभणार आहेत जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

वटवृक्षाची पूजा केल्याने लाभणारे फायदे

  • पुराणात ज्या झाडांना फलदायी असे म्हटले जाते त्यामध्ये वटवृक्षाचा म्हणजेच वडाच्या झाडाचा देखील समावेश आहे. असे म्हणतात की हे झाड इतके पवित्र आहे की त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचा वास असतो. वटपौर्णिमेला या झाडाची पूजा करण्यामागे पतीच्या दीर्घायुष्याची इच्छा व्यक्त करणे आहे.
  • वटपौर्णिमेला स्त्रिया वाडाच्या झाडाची पूजा करतात आणि अशी इच्छा व्यक्त करतात की या वटवृक्षाचं आयुष्य जसे दीर्घकाळ असते, वटवृक्ष 300 पेक्षा जास्त आयुष्य जगतो. त्याचप्रमाणे पतीलाही दीर्घायुष्य लाभावं
  • वटवृक्ष जसा हिरवागार राहतो तसं त्यांचं कुंकू देखील कायम दीर्घायुषी रहावं आणि पतीवर कोणतही संकट येऊ नये.
  • पौराणिक कथेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमराजपासून पती सत्यवान यांचे प्राण परत आणले. यासाठी सावित्रीने पती सत्यवानला वटवृक्षाखाली झोपवले. तिथे पूजा करुन त्यांचे आयुष्य परत मागितले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
  • अमावस्येच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने मुलं नसलेल्याना संतान होण्याची त्यांची इच्छा पूर्ण होते.
  • अमावस्या ही पित्रांना समर्पित असते. यादिवशी वटवृक्षाची पूजा करणं तसंच पाणी घातल्याने पित्रांना शांती लाभते. परिवारातील सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते.
  • वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देते. हे झाड दिवसात 20 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सीजन देण्याचे काम करते. याझाडाच्या फांद्यात कार्बन डायऑक्साइड घेण्याची क्षमता असते. हे वातावरण शुद्ध ठेवायचे काम करते. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखलं जातो. अशी झाडं जगवणं पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगलं आहे. वटपौर्णिमेलाच नाहीतर इतर कोणत्याही अमावस्येला तुम्ही वटवृक्षाची विधीवत पूजा करणं लाभदायीच आहे.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.