Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय, भोलेनाथाची बरसेल कृपा
सोमवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय भगवान शिवाची कृपा कायम राहते
मुंबई, हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवार हा शिवाचा दिवस मानला जातो. म्हणूनच शिव भक्त सोमवारी (Somwar Upay) उपवास करतात आणि भक्ती भावाने भगवान शिवाची पूजा करतात. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते.
असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती प्राप्त होते आणि भक्तांवर भगवान शंकराचा आशीर्वाद कायम राहतो. जाणून घेऊया सोमवारी करायच्या उपायांबद्दल.
भगवान शिवाची भक्ती भावाने पूजा करा
भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्ती भावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी.
भोलेनाथाला करा या वस्तू अर्पण
सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षत, बिल्वपत्र, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.
या वस्तू करा शिवाला अर्पण
सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नैवेद्यानंतर भोलेनाथाची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील.
या मंत्राने होईल फायदा
सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होते. शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो.
गरजू लोकांना दान करा
सोमवारी स्नान केल्यानंतर पांढर्या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी पांढर्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत. यामुळे कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)