Spiritual: तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरु होणार

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप (Bansal) खुपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन (Puja) केल्याने व्यक्‍तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खुप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची […]

Spiritual: तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरु होणार
तुलसी पूजा मंत्र
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 5:38 PM

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप (Bansal) खुपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्य पूजन (Puja) केल्याने व्यक्‍तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खुप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्‌भुत शक्‍ती आहे. याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्‍तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्‍तीचा संचार होतो.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे , म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे. ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याचसोबत आपल्याला काही संकेत ही देतात. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात.

घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा. चला तर मग जाणून घेऊया हे संकेत.

हे सुद्धा वाचा

काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते, आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्‍तीचा वास आहे. किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा ही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका.

तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी सारख्य़ा समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. अस होत असल्यास, विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावा.

तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खुप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल संकेत देतात. आपण अस ही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्‍ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्‍तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.