Spiritual: अशी ओळखा राम आणि कृष्ण तुळस, जाणून घ्या नियम
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते (Tulsi Plant Importance) . तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशी (Types of Tilsi) असते, तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. ज्याच्या घरी तुळस राहते त्या घरावर विष्णूची कृपा सदैव राहते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून तुळशीला ओळखले जाते. सामान्य सर्दी आणि कफ मुक्त […]
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते (Tulsi Plant Importance) . तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशी (Types of Tilsi) असते, तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. ज्याच्या घरी तुळस राहते त्या घरावर विष्णूची कृपा सदैव राहते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून तुळशीला ओळखले जाते. सामान्य सर्दी आणि कफ मुक्त होण्यास तुळशीची मदत होते. वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. घरच्या तुळशीला नियमित पाणी देणे आणि पूजेसाठी तुळशीचे पान तोडणे ही फार जुनी संस्कृती आहे. परंतु शास्त्रात याबद्दल काही नियम सांगितले आहे.
प्रत्येकांच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत तुळसीचं रोप लावलेलं असतं. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जात. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. यासोबतच तुळशीची पूजा, देखभाल इत्यादीबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्याने विशेष फायदा होतो.
या दोन प्रकारच्या असतात तुळशी
तुळशीचे दोन प्रकार आहेत, राम आणि कृष्ण तुळस. पण घरात कोणत्या तुळशीचे रोप लावणे शुभ आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यासाठी या दोघांमधील फरक जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
राम तुळस : रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असून त्याची पाने गोड असतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते. घरात असणे खूप शुभ असते.
कृष्ण तुळस : कृष्ण तुळस घरी लावणे खूप शुभ आहे, तसेच आयुर्वेदातही याला खूप महत्त्व दिले गेले आहे. कृष्ण तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कृष्ण तुळशीची पाने काळ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे.
या दिवशी तुळशीला घालू नये पाणी
असे मानले जाते की एकादशीला तुळशीचा विवाह विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार देवउठी एकादशीला दोघांनी रितीरिवाजानुसार लग्न केल्याची पुराणात माहिती आहे. एकादशीला तुळस उपवास ठेवते, असाही समज आहे. या त्यादिवशी तुळशीला जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते. त्यामुळे तुळस सुकायला लागतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)