Surya Grahan 2021 Today | आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतातून कधी आणि कुठे पाहता येईल?

Surya Grahan 2021 Today आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतातून कधी आणि कुठे पाहता येईल?आज म्हणजेच ४ डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण या वर्षीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

Surya Grahan 2021 Today | आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतातून कधी आणि कुठे पाहता येईल?
surya-grahan-2021
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 9:26 AM

मुंबई : आज म्हणजेच ४ डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे या वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. ग्रहण या शब्दाला घेऊन पुराणांमध्ये अनेक मान्यता आहेत. या काळात वातावरण प्रदुषित होते त्यामुळे या काळात खालेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण या वर्षीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही पण याचा अर्थ असा नाही त्याकडे दुर्लक्ष करायला हवे. या सूर्यग्रहणाचा प्रभाव काही राशींवरही पडेल. हे सूर्यग्रहण दक्षिण आफ्रिका आणि मॅनिबिया तसेच दक्षिण आफ्रिकेच्या काही भागांमध्येच दिसेल. मात्र, त्यातही संपूर्ण सूर्यग्रहण दिसणार नाही, तर आंशिक सूर्यग्रहण दिसेल.

? हे सूर्यग्रहण कुठे दिसणार? 2021 चे अंतिम सूर्यग्रहण दक्षिण आफ्रिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे.

?सूर्यग्रहण वेळ शनिवारी, 4 डिसेंबर रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सकाळी 10:59 पासून सुरू होईल. संपूर्ण ग्रहण दुपारी 12.30 वाजता सुरू होईल आणि जास्तीत जास्त ग्रहण दुपारी 1:03 वाजता राहील.

?हे सूर्यग्रहण किती काळ असेल? हे सूर्यग्रहण या वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल, जे 4 तास 8 मिनिटे चालेल. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये.

?हे सूर्यग्रहण कुठे आणि कसे पहायचे? २०२१ सालचे शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, तरीही तुम्ही ते पाहू शकता. खरं तर, नासाच्या स्कायवॉचर्स थेट प्रक्षेपणातून तुम्ही सूर्यग्रहण पाहू शकतात, याचे चित्रण अंटार्क्टिकामधील युनियन ग्लेशियरवरून केले जाईल. याशिवाय, हे सूर्यग्रहण नासाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल, जे तुम्ही घरबसल्या सहज पाहू शकता.

ग्रहण लागलेल्या सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका, जरी ते थोड्या काळासाठीच असले तरीही. चंद्राने सूर्याचा बराचसा भाग व्यापला असला तरीही तो तुमच्या डोळ्यांना हानी पोहोचवू शकतो, ज्यामुळे तुम्ही आंधळे होऊ शकता. त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या :

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.