Surya Grahan 2024 Date and Timings : यंदाच्या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण ‘या’ दिवशी दिसणार, दिवसा होणार पूर्ण अंधार, भारतामध्ये…

Surya Grahan 2024 : यंदाच्या वर्षीच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. लवकरच यंदाच्या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी पूर्णपणे अंधार होणार आहे. चला तर मग जाणून घ्या या सूर्यग्रहणाबद्दल अधिक आणि नेमके कधी आणि कोणत्या भागात दिसणार ते सविस्तरपणे.

Surya Grahan 2024 Date and Timings : यंदाच्या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण 'या' दिवशी दिसणार, दिवसा होणार पूर्ण अंधार, भारतामध्ये...
Surya Grahan
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 11:50 AM

यंदाच्या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी झाले. आता यावर्षीच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे. अनेक भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण अत्यंत खास आहे. या सूर्यग्रहणात दिवसाला अंधार पडणार आहे. हेच नाहीतर काही तास हे सूर्यग्रहण राहणार आहे. सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. 2024 मध्ये एकूण 4 ग्रहणे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक सूर्यग्रहण अगोदर झाले असून हे सूर्यग्रहण दुसरे असणार आहे. 

सूर्यग्रहणात चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये जातो तेव्हा यावेळी सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आणि दिवसाला देखील संपूर्ण काळोखा म्हणजेच अंधार होतो. याच सर्व घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. या सूर्यग्रहणाच्या काळात एक वेगळा अनुभव मिळतो. या सूर्यग्रहणामुळे सौरऊर्जा निर्मितीचे मोठे नुकसान हे होऊ शकते आणि सूर्यग्रहण कधीही थेट पाहून नये. 

यंदाच्या वर्षीचे हे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी दिसणार आहे. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण तब्बल 6 तास राहणार आहे. अमेरिकेत हे सूर्यग्रहण साधारणपणे सकाळी 11 ला सुरू होईल आणि संध्याकाळी 5 ला संपेल. भारतीय वेळेनुसार रात्री 9.13 ते 3.17 पर्यंत राहणार आहे. यावेळी रात्री पूर्णपणे अंधार पडेल. हे सूर्यग्रहण अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, ब्राझील, पेरू, चिली, बेट, अर्जेंटिना, मेक्सिको, फिजी, अंटार्क्टिका याठिकाणी दिसणार आहे. 

हे सूर्यग्रहण अमेरिकेसह अनेक इतर देशांमध्ये दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये. 5 महिन्यांनंतर 2024 मधील हे दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. 8 एप्रिल 2024 रोजी झालेले सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. सूर्यग्रहण काळामध्ये अनेक शुभ कार्य केली जात नाहीत.

सूर्यग्रहण थेट पाहण्याने आपल्या डोळ्यांचे नुकसान देखील होऊ शकते. यामुळेच तज्ज्ञ थेट डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्यास मनाई करतात. यामुळे आपल्या डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सूर्यग्रहणाबद्दल नेहमीच लोकांमध्ये मोठे कुतूहल बघायला मिळते. सूर्यग्रहणाचा दिवस शास्त्रज्ञांसाठी देखील अत्यंत मोठा असतो. अनेक बदल ग्रहणाच्या वेळी बघायला मिळतात. 

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....