Suryadev Puja Benefits: आयुष्यात प्रगती थांबली आहे?; मग दर रविवारी अशा प्रकारे करा सूर्य देवाची पूजा

संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे सूर्य देव हे केवळ संपूर्ण जगाचे  उद्धारकर्ता (Progress in life has stopped) नसून ते नवग्रहांचे स्वामी मानले जातात. सूर्यदेव असा देव आहे ज्याच्या दर्शनाशिवाय कोणाचाही दिवस सुरू होत नाही. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. भगवान सूर्याचा दिवस असल्याने रविवारी भगवान सूर्याची पूजा करणे पुण्यकारक मानले जाते (Suryadev Puja Benefits). सूर्यदेवाला […]

Suryadev Puja Benefits: आयुष्यात प्रगती थांबली आहे?; मग दर रविवारी अशा प्रकारे करा सूर्य देवाची पूजा
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 10:34 AM

संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे सूर्य देव हे केवळ संपूर्ण जगाचे  उद्धारकर्ता (Progress in life has stopped) नसून ते नवग्रहांचे स्वामी मानले जातात. सूर्यदेव असा देव आहे ज्याच्या दर्शनाशिवाय कोणाचाही दिवस सुरू होत नाही. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. भगवान सूर्याचा दिवस असल्याने रविवारी भगवान सूर्याची पूजा करणे पुण्यकारक मानले जाते (Suryadev Puja Benefits). सूर्यदेवाला हिरण्यगर्भ असेही म्हणतात. हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्या पोटात सोनेरी आभा आहे. त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रविवारी सूर्यदेवाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे. असे केल्याने आपल्या कुटुंबावर सूर्याची कृपा राहते. उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याने प्रगती होते. सकाळी लवकर आंघोळ करून उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. जाणून घेऊया रविवारच्या दिवशी साऱ्याची पूजा करण्याचे फायदे.

  1. कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर मान-प्रतिष्ठा मिळते. राजकीय क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात आणि नोकरीमध्ये प्रगतीकरण्यासाठी सूर्याची कृपा खूप महत्त्वाची आहे. सूर्य स्वत: राजा आहे, म्हणून राजकारण किंवा राज्य कारभाराशी संबंधित व्यवसायाशी संबंधितांनी रविवारी सूर्याची पूजा करावी.
  2. रविवारी सूर्यदेवाचे पूजन केल्याने मान-सन्मान मिळतो. भाग्योदय होतो, ज्यामुळे नोकरीशी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न राहिल्याने सर्व अशुभ परिणामांचे रूपांतर शुभ परिणामात होते. रविवारी सूर्याला जल अर्पण केल्याने बुद्धी, ज्ञान, वैभव, तेज आणि सामर्थ्य वाढते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. रविवारी तेल आणि मीठाचे सेवन करू नये. रविवारी आहारात मांस आणि मद्य व्यर्ज करावे. रविवारी तेल मसाज करू नये. या दिवशी चुकूनही तांब्याच्या धातूची खरेदी-विक्री करू नका.
  5. सनातन धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा आहे. वैदिक काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते. भगवान राम रोज सूर्याची पूजा करत असत. दररोज सूर्याला जल अर्पण करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे, परंतु दररोज करणे शक्य नसल्यास किमान रविवारी न चुकता सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते.
  6.  सूर्याला जल अर्पण करण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहे.  सूर्याला स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. सूर्यदेवाला  सूर्योदयानंतर एक तासाच्या आत अर्घ्य द्यावे. सकाळी ८ वाजेपर्यंत सूर्याला अर्घ्य दिल्यास विशेष लाभ मिळतो. सूर्याला पाणी देण्यापूर्वी त्या पाण्यात चिमूटभर रोळी किंवा लाल चंदन टाकून अर्पण करावे .

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....