आयुष्यात यश मिळवाचयं ? देवी लक्ष्मीला प्रसन्न कराचंय? मग अन्न खाताना काही नियम लक्षात ठेवा
हिंदू धर्मामध्ये अन्नाला देवाची उपमा दिली गेली आहे. आपल्या ताटात आलेले अन्नाला देवानी दिलेला आशीर्वाद समजून आपण खात असतो. अन्न हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
मुंबई : हिंदू धर्मामध्ये अन्नाला देवाची उपमा दिली गेली आहे. आपल्या ताटात आलेले अन्नाला देवानी दिलेला आशीर्वाद समजून आपण खात असतो. अन्न हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अन्न हे जीवनातील सर्व शक्तींचे स्त्रोत देखील आहे. यामुळेच हिंदू धर्मात अन्नाबाबत अनेक विशेष नियम सांगण्यात आले आहेत, अन्न कसे खावे? त्याच प्रमाणे अन्न खाताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते नियम.
पौराणिक शास्त्रांमध्ये अन्नासंबंधीत काही नियम सांगण्यात आले आहेत.सनातन धर्मात अन्न खाण्यापूर्वी तीन वेळा पाणी शिंपडणे आवश्यक असते. असे केल्याने आपण अन्नदेवताला प्रसन्न करतो. तर त्यामगील वैज्ञानीक कारण असे आहे की पूर्वीच्या काळात सर्वच लोक खाली बसून जेवत असे. त्यामुळे ताटाच्या आजूबाजूला पाण्याचे वर्तुळ काढले जायचे. त्यामुळे ताटामध्ये कोणत्याही प्रकारचे जंतू जात नसतं. पुराणात दिलेल्या या गोष्टींना वैज्ञानीक कारण देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या काळाच सुदधा जर तुम्ही जमिनीवर बसून जेवत असाल तर ही गोष्ट तुम्ही करु शकता.
पौराणिक ग्रंथांमध्ये अन्न नेहमी शुद्ध केलेल्या ठिकाणी बनवावे असे सांगण्यात आले आहे. शुद्ध ठिकाणी तयार केलेल्या अन्नामध्ये ताजेपणा असतो. जर घरातील स्त्री जेवण बनवत असेल तर जेवणामध्ये सकारात्मकता येते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. इतकेच नाही तर हिंदू मान्यतेनुसार अन्न प्रथम अग्निदेवतेला अर्पण केले जाते. याशिवाय अन्न खाण्याआधी ब्रह्मपरं ब्रह्महवीरब्रह्मग्नौ ब्रह्मण हुतं। ब्रह्मव तेन गंताव्यं ब्रह्मकर्म समाधिना । या मंत्राचा जप अवश्य करावा,
पाहूण्यांचा आदर सत्कार करा घरामध्ये कोण अतिथी आला असेल तर त्यासाठी जेवणाची व्यवस्था करावी. भारतीय संस्कृतीत अतिथीला देव मानले गेले आहे. त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने आदर सत्कार करणे आपले कर्तव्य असते. जर घरात अन्न कमी असले तरी पाहुण्यांसाठी ताजे अन्न तयार करावे. यामुळा आतिथीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.
अन्नाची निंदा करु नका जेवताना नेहमी लक्षात ठेवा की अन्नाची निंदा करू नये. अन्न कितीही वाईट बनले तरी ते अन्न देवाला नैवेद्य म्हणून खावे, आपण अन्नाला देवता मानतो त्यामुळे अन्नाची निंदा म्हणजेच देवाचा अपमान म्हणूनच ताटात आलेल्या अन्नाचा मनापासून आस्वाद घ्यावा. असे केल्याने जीवनात अनेक सकारात्मक परिणाम होतात.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
इतर बातम्या :
Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार