Ayodhya Test | “श्री राम”संदर्भात परीक्षा द्या, मोफत अयोध्या यात्रा, रामलल्लाचे VIP दर्शन घ्या

मध्य प्रदेशात सध्या शिक्षणाला धर्माची जोड देण्याचा ट्रेंड वाढला आहे. वैद्यकीय शिक्षणात हेडगेवार, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि उच्च शिक्षणातील रामचरितमानस आणि राम सेतूच्या पठणानंतर आता मध्यप्रदेशातील शाळांमध्ये भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशातील तुलसी मानस प्रतिष्ठान आणि मध्य प्रदोशातील संस्कृती विभाग डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेणार आहे.

Ayodhya Test | श्री रामसंदर्भात परीक्षा द्या, मोफत अयोध्या यात्रा, रामलल्लाचे VIP दर्शन घ्या
ayodhya-ram-mandir
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 8:38 AM

भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या शिक्षणाला धर्माची जोड देण्याचा ट्रेंड वाढला आहे. वैद्यकीय शिक्षणात हेडगेवार, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि उच्च शिक्षणातील रामचरितमानस आणि राम सेतूच्या पठणानंतर आता मध्यप्रदेशातील शाळांमध्ये भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशातील तुलसी मानस प्रतिष्ठान आणि मध्य प्रदोशातील संस्कृती विभाग डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेणार आहे.

ही परीक्षा मध्य प्रदेशातील सर्व 52 जिल्ह्यांमध्ये घेतली जाईल. या परीक्षेत अयोध्या घटनेच्या वेगवेगळ्या प्रसंगांवर प्रश्न विचारले जातील. भगवान राम यांच्याशी संबंधित 100 प्रश्न आणि त्यांच्या वनवासात घडलेल्या सर्व घटना या परीक्षेत विचारल्या जातील.

टॉपरला बक्षिस म्हणून अयोध्येचा प्रवास

या परीक्षेतील सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे विजेत्याला रोख बक्षीस दिले जाणार नाही. तर त्याला चार्टर्ड विमानाने अयोध्येपर्यंत यात्रा आणि त्यानंतर त्याला रामललाचे व्हीव्हीआयपी दर्शन करायला मिळेल.

प्रत्येक जिल्ह्यातून तीन जणांची निवड केली जाईल

या परीक्षेत 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय असतील. परीक्षकाला योग्य उत्तरावर खूण करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यातून 3 विद्यार्थी आणि तीन सामान्य लोकांची निवड केली जाईल. यानंतर, विविध जिल्ह्यांतील विजेत्यांना चार्टर्ड प्लेनद्वारे अयोध्येला नेले जाईल. अयोध्येत रामललाचे व्हीव्हीआयपी दर्शन होईल.

परीक्षा शुल्क 100 रुपये

तुलसी मानस प्रतिष्ठानने एक प्रस्ताव तयार केला आहे आणि तो संस्कृती विभागाकडे पाठवला आहे. जिथे आवश्यक औपचारिकतांसाठी शासकीय स्तरावर चर्चा देखील सुरु झाली आहे. डिसेंबर महिन्याची निवड या परीक्षेसाठी करण्यात आली आहे. कारण तोपर्यंत शाळांमध्ये होणाऱ्या सहामाही परीक्षाही पूर्ण होतील आणि विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षांसाठी 2 ते 3 महिने असतील. या दरम्यान, ते सहजपणे या परीक्षेत भाग घेऊ शकतील. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला नोंदणी शुल्क म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील.

संबंधित बातम्या :

कुंडलीतील मंगळाला बळ देते पोवळे रत्न, जाणून घ्या ते कधी आणि कसे घालावे हे

Vastu Upay : ‘या’ गोष्टी प्रमोशनमध्ये अडथळा बनू शकतात, घर आणि ऑफिसमध्ये ‘या’ गोष्टी करा!

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.